Diwali Bonus : राज्य सरकारची मोठी घोषणा! यंदाची दिवाळी ठरणार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांठी खास

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा राज्य सरकराने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी दिवाळीनिमित्त खास बोनस जाहीर केला आहे.

Diwali Bonus : राज्य सरकारची मोठी घोषणा! यंदाची दिवाळी ठरणार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांठी खास

मुंबई: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा राज्य सरकराने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी दिवाळीनिमित्त खास बोनस जाहीर केला आहे. 'दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी राज्य सरकार दोन हजार रुपये भाऊबीज म्हणून भेट देणार आहेत', अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली. पुढे, आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली की, 'अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीनिमित्त बोनस देण्यासाठी एकूण 40.61 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे'. यामुळे, यंदाची दिवाळी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी खास ठरणार आहे. 

हेही वाचा: Dharashiv Collector Dance : मराठवाड्यातील शेतकरी संकटात मात्र जिल्हाधिकारी नाचण्यात दंग

लहान बाळांची काळजी घेण्यासाठी, त्यांच्या पोषणासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिला महत्त्वाची सेवा बजावतात. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही भाऊबीजेची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. आदिती तटकरे म्हणाल्या, 'प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही आपल्या समाजातील शक्ती आहे. त्यामुळे, त्यांचा सण आनंदात साजरा व्हावा हीच आमची भूमिका आहे'. लवकरच, भाऊबीजेची रक्कम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांना देण्यात येईल. यादरम्यान, आदिती तटकरे म्हणाल्या की, 'राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांचा आनंद द्विगुणीत होईल'. 

या योजनेसाठीचा निधी एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त कार्यालयामार्फत वाटप केले जाईल. ही रक्कम जिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जमा केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीच्या दोन आठवड्यात हा बोनस जमा केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number