येत्या 15 जानेवारीला राज्यात 29 महापालिका क्षेत्रात मतदान होणार आहे. मुंबईत भाजप विरूद्ध ठाकरे बंधू, पुण्यात भाजप विरूद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशा अनेक चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.
राज्यात 13 ते 16 जानेवारी या कालावधीत जिथे महापालिका निवडणुका आहेत, तिथे ड्राय डे लागू करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकांसाठीचा प्रचार 13 जानेवारीला संपणार आहे.
जिथे जिथे निवडणुका आहेत, तिथे दारूची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. मंगळवारी म्हणजेच सायंकाळी 6 वाजेपासून राज्यात सर्व 29 महापालिका क्षेत्रात ड्राय डे असणार आहे
राज्यात 29 महानगरपालिकांची निवडणूक होत आहे. यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर महानगरांमध्ये महानगरपालिका निवडणुका होत आहेत.