उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन अपडेट समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दादरमधील त्यांच्या 'शिवतीर्थ' या निवास्थानी दाखल झाले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन अपडेट समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दादरमधील त्यांच्या 'शिवतीर्थ' या निवास्थानी दाखल झाले आहेत. माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी आले आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची 'राजभेट' अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत हे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी सतत शिवतीर्थावर जात होते. मात्र, मंगळवारी एकनाथ शिंदे यांनी स्वतः राज ठाकरेंना भेटण्यासाठी त्यांच्या 'शिवतीर्थ' या निवास्थानी दाखल झाले. 

शिवतीर्थ बंगल्यावर श्रीकांत शिंदेंची उपस्थिती

राज ठाकरेंना भेटण्यासाठी शिवतीर्थ या निवास्थानी पितापुत्र म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे देखील शिवतीर्थ या निवास्थानी दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या या भेटीचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र, या भेटीनंतर आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

मंत्री उदय सामंत यांची शिवतीर्थ बंगल्यावर हजेरी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'शिवतीर्थ' या निवास्थानी दाखल होण्यापूर्वी त्यांचे विश्वासू नेते मंत्री उदय सामंत हे देखील राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर दाखल झाले. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी माध्यमांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांनी या भेटीबाबत सांगितले की, 'या भेटीबाबत मला जास्त माहिती नाही. मी कुर्ल्यात वेगळ्या कार्यक्रमासाठी आलो होतो. तेव्हा मला अचानक फोन आला की, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी येत आहेत. त्यामुळे मलाही बोलावलं गेलं. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होईल हे आता तेच सविस्तर सांगू शकतात. ही भेट नेमकी कशासाठी आहे याबद्दल मला काहीही माहित नाही', अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी माध्यमांना दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number