‘…तर निर्बंध कडक करा’ मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरच्या अनलॉक प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला काही सूचना दिल्या आहेत. ‘कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही. ‘ब्रेक द चेन’मध्ये आपण जे निकष आणि पाच टप्पे दिले आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत. तसेच कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रमासाठी गर्दी होणार […]

‘…तर निर्बंध कडक करा’ मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरच्या अनलॉक प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला काही सूचना दिल्या आहेत.

‘कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही. ‘ब्रेक द चेन’मध्ये आपण जे निकष आणि पाच टप्पे दिले आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत. तसेच कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रमासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या,’ असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

ब्रेक द चेनमध्ये निर्बंधांबाबत निकष आणि टप्पे निश्चित करणाऱ्या आदेशानंतर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त आणि पोलीस अधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली. त्यावेळी राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आले नसून आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number