दहावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर 50,667 विद्यार्थी उत्तीर्ण

राज्य मंडळाचा दहावीच्या फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल आज जाहीर झाला आहे. राज्यातील एकूण 22.86 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परिक्षेसाठी एकूण 2,21, 629 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 50,667 विद्यार्थी पास झाले आहेत. 17 ते 30 जुलै दरम्यान ही फेरपरीक्षा झाली होती. या परीक्षेत एक किंवा दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1,18,161 एवढी आहे. मुंबईत एकूण […]

दहावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर 50,667 विद्यार्थी उत्तीर्ण

राज्य मंडळाचा दहावीच्या फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल आज जाहीर झाला आहे. राज्यातील एकूण 22.86 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परिक्षेसाठी एकूण 2,21, 629 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 50,667 विद्यार्थी पास झाले आहेत.

17 ते 30 जुलै दरम्यान ही फेरपरीक्षा झाली होती.

या परीक्षेत एक किंवा दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1,18,161 एवढी आहे.

मुंबईत एकूण 53,934 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी 7,612 विद्यार्थी पास झाले.

पुनर्गुणपडताळणी करण्यासाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत आहे.

उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपी 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी  आवश्यक आहे, असं मंडळाने जाहीर केलंय.

मंडळनिहाय निकाल

विभागीय मंडळ – टक्केवारी
पुणे –        18.12
नागपूर –    30.89
औरंगाबाद –   28.25
मुंबई –   14.48
कोल्हापूर – 15.17
अमरावती – 29.53
नाशिक –      25.08
लातूर –        31.49
कोकण –     15.81

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number