महाराष्ट्रात एका, झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान

महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दोन्ही राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

महाराष्ट्रात एका, झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दोन्ही राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात एका आणि झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांची मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होईल. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला तर झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.

याआधी २०१९ मध्ये महाराष्ट्रात विधानसभेसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान झाले आणि मतमोजणी २४ ऑक्टोबर रोजी झाली होती. यावेळी साधारण एक महिना उशिराने मतदान आणि मतमोजणी होणार आहे. 

महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान
झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान
महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान 
झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबरला मतदान 
दोन्ही राज्यात २३ नोव्हेंबरला मतमोजणी

विधानसभा निवडणूक २०१९ – भाजपा १०५, शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५४, काँग्रेस ४४
विधानसभा निवडणूक २०१४ – भाजपा १२२, शिवसेना ६३, राष्ट्रवादी काँग्रेस ४१, काँग्रेस ४२

महाराष्ट्रात ३६ जिल्हे, विधानसभेचे २८८ मतदारसंघ, ९.६३ कोटी मतदार
महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेची कालमर्यादा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपणार

मोठा फरक

महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे प्रमुख राजकीय पक्ष होते. याउलट २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, राशप, शिउबाठा, हे सहा प्रमुख पक्ष आहेत. या व्यतिरिक्त २०२४ च्या निवडणुकीत मनसे, वंचित, एमआयएम हे पक्ष अनेक जागा लढवण्याची तयारी करत आहेत. मनसेने स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे तर वंचितचे उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

निवडणूक अधिसूचना २२ ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस २९ ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्जांची छाननी ३० ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस ४ नोव्हेंबर २०२४
मतदान २० नोव्हेंबर २०२४
मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४
निवडणूक प्रक्रिया संपणार २५ नोव्हेंबर २०२४

झारखंड विधानसभा निवडणूक २०२४

निवडणूक अधिसूचना १८ आणि २२ ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस २५ आणि २९ ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्जांची छाननी २८ आणि ३० ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस ३० ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०२४
मतदान १३ आणि २० नोव्हेंबर २०२४
मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४
निवडणूक प्रक्रिया संपणार २५ नोव्हेंबर २०२४

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number