हेच ते मराठीचे ‘मारक मेहता’, मनसेचा आरोप

मनसे पुन्हा एकदा मराठीसाठी आक्रमक झाली आहे. हिंदीमधील एका प्रसिद्ध मालिकेत हिंदी ही मुंबईची सर्वसाधारण भाषा असल्याचं सांगितलं आहे. यावरुन या वादाला तोंड फुटलं आहे. या मुद्दयावरुन मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने या संदर्भात एक व्हिडिओ आणि एक पोस्ट ट्विट केला आहे. नक्की प्रकरण काय ? ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही प्रसिद्ध मालिका आहे. […]

हेच ते मराठीचे ‘मारक मेहता’, मनसेचा आरोप

मनसे पुन्हा एकदा मराठीसाठी आक्रमक झाली आहे. हिंदीमधील एका प्रसिद्ध मालिकेत हिंदी ही मुंबईची सर्वसाधारण भाषा असल्याचं सांगितलं आहे.

यावरुन या वादाला तोंड फुटलं आहे. या मुद्दयावरुन मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने या संदर्भात एक व्हिडिओ आणि एक पोस्ट ट्विट केला आहे.

नक्की प्रकरण काय ?

‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही प्रसिद्ध मालिका आहे.

आपलं गोकुळधाम मुंबईत आहे. मुंबईची सर्वसाधरण भाषा ही हिंदी आहे. त्यामुळे आपण सुविचार हिंदीत लिहितो. जर गोकुळधाम चेन्नईत असतं तर, तामिळमध्ये सुविचार लिहिला असतं.

तसंच गोकुळधाम अमेरिकेत असतं तर इंग्रजीत सुविचार लिहिलं असतं, असं या व्हिडिओत या मालिकेतील चंपकलाल या पात्राने हे वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरुन हा वादाला तोडं फुटलं आहे.

या सर्व प्रकारामुळे मनसे आक्रमक झाली आहे. यांची मस्ती उतरवावीच लागेल, असं मनसेने म्हटलं आहे.

मनसेने काय म्हटलंय ?

मनसेचा विरोध याच नीच वृत्तीला आहे. मुंबईची भाषा मराठी हे यांना माहिती आहे. तरीही मालिकांमधून असा जाणीवपूर्वक अपप्रचार सुरु असतो. यांची मस्ती उतरवावीच लागेल.

या गुजराथी किंड्याची वळवळ थांबवावीच लागेल,असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तसचं यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही यात काही चूक वाटत नाही, याचीच शरम वाटते, असंही या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान जेव्हा जेव्हा मराठीची गळचेपी होते, तेव्हा तेव्हा मनसेने मराठी भाषेसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच मनसे मराठी चित्रपटांना शो प्राप्त व्हावा, यासाठी मनसे आग्रही असते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number