मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ४ जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षासाठी गंगाखेडची जागा सोडली आहे. त्यामुळे महायुतीशी फारकत घेणारे जानकर पुन्हा महायुतीत येण्याची शक्यता आहे. बडनेरा ही जागा रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षासाठी सोडण्यात आली आहे. कालिना जागा रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी सोडली आहे. शाहूवाडी मतदारसंघ हा विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला सोडली आहे. कालिनातून भाजपाचे नेते अमरजित सिंह रिपाइंच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहेत.