नव्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले

जगात कोरोनाचा हाहाकर सुरू आहे. ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूमुळे राज्यात अधिक दक्षता घेतली जात आहे. शिवाय परदेशातून अन्य राज्यात प्रवाशी उतरतील हे लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांना विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वर्षा निवासस्थानी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले. महाराष्ट्रातील […]

नव्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले

जगात कोरोनाचा हाहाकर सुरू आहे. ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूमुळे राज्यात अधिक दक्षता घेतली जात आहे. शिवाय परदेशातून अन्य राज्यात प्रवाशी उतरतील हे लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांना विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वर्षा निवासस्थानी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले. महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. शिवाय यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे व टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

कोरोना लसीकरणाचा ड्राय रन नुकताच सुरू आहे. शिवाय लवकरच केंद्र शासनाकडून लस प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात होईल. त्याबाबतच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. “ब्रिटनमधून थेट मुंबईत उतरलेल्या प्रवाशांना नियमाप्रमाणे विमानतळावरून संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात येते. मात्र गेल्या काही दिवसांपासून असे निदर्शनास आले आहे की, इतर राज्यातील विमानतळांवर उतरून प्रवाशी देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येतात. त्यामुळे त्यांची माहीती काढणं शक्य होत नाही. यामुळे केंद्र सरकारने अशा परदेश प्रवास करून आलेल्यांना त्या-त्या विमानतळांवरून क्वारंटाईन करावे”

मुख्यमंत्र्यांनी लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर म्हणाले की, “ लसीकरणानंतर त्याचे काही दुष्परिणाम झाल्यास त्यावरील उपचाराची पूर्वतयारी ठेवा. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शनासाठी टास्क फोर्ससारखी यंत्रणा तयार करावी. आरोग्य संस्थांमध्येच लसीकरण करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या” तसेच यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी लसीकरणाच्या तयारीचे सादरीकरण केले. शिवाय बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, वैद्यकीय शिक्षम संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number