माधुरीचं ट्विट का होतंय व्हायरल?

सर्वांना आपल्या मनमोहक अदांनी भुरळ पाडणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अशातच तिने नुकताच ट्विट केलेलं फोटो सोसिअल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात ती एका व्यक्तीसोबत वडापावचा आनंद लुटताना दिसत आहे. आता या फोटोतील व्यक्ती कोण अशा चर्चा रंगल्या आहेत. मुळात ती व्यक्तीच तितकी मोठी आहे. ट्विटमध्ये माधुरी सोबत दिसणारी […]

माधुरीचं ट्विट का होतंय व्हायरल?

सर्वांना आपल्या मनमोहक अदांनी भुरळ पाडणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अशातच तिने नुकताच ट्विट केलेलं फोटो सोसिअल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात ती एका व्यक्तीसोबत वडापावचा आनंद लुटताना दिसत आहे. आता या फोटोतील व्यक्ती कोण अशा चर्चा रंगल्या आहेत. मुळात ती व्यक्तीच तितकी मोठी आहे.

ट्विटमध्ये माधुरी सोबत दिसणारी व्यक्ती हे अ‍ॅप्पल कंपनीचे सीईओ टिम कुक हे असून माधुरीने मुंबईच्या खास वडापावची ट्रीट देत त्यांचं मुंबईत स्वागत केले आहे. माधुरीच्या ट्विटमध्ये टिम कुक आणि तिला एकत्र पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याने या पोस्टवर चाहत्यांकडून वेगवेगळ्या कमेंट्स केल्या जात आहेत.

मुख्य म्हणजे माधुरी दीक्षित सोबत टिम कुक यांनी देखील ट्विटरवर माधुरीसोबत वडापाव खातानाचे फोटो ट्विट केले आहेत. त्यावर “मला माझ्या पहिल्या वाडापावची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. वडापाव खरंच खूप स्वादिष्ट होता”, असं कुक आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. दुसरीकडे माधुरीने यावर “मुंबईत वडापाव खाऊन स्वागत करण्यासारखं दुसरं स्वागत होऊच शकत नाही”,अशी प्रतिक्रिया दिली.

टिम कुक भारतात का आलेत?
टिम कुक हे आयफोनचे निर्माते आणि अ‍ॅप्पल कंपनीचे सीईओ आहेत. लवकरच भारतात अ‍ॅप्पल कंपनीचं पहिलं अ‍ॅप्पल स्टोअर सुरु होणार असल्याने टिम कूक भारतात आले आहेत. भारत दौऱ्याच्या पहिल्याच दिशी टिम कुक यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांची भेट घेतली. त्यानंतर अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यासोबत मुंबईच्या प्रसिद्ध वडापावचा आस्वाद घेतला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number