LPG Price : गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

इंडियन ऑइलने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली असून ही घसरण मागील 7 महिन्यांतील सर्वात मोठी मानली जात आहे.

LPG Price : गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

मुंबई: देशातील कोट्यवधी एलपीजी ग्राहकांसाठी मे महिन्याची सुरुवात दिलासादायक ठरली आहे. इंडियन ऑइलने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली असून ही घसरण मागील 7 महिन्यांतील सर्वात मोठी मानली जात आहे. सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅसच्या किमतीत घट झाल्याने हॉटेल, कॅंटीन, उद्योग क्षेत्रातील लघु व मध्यम व्यावसायिकांना याचा मोठा लाभ होणार आहे. देशातील 33 कोटींपेक्षा जास्त एलपीजी ग्राहकांना हा बदल थेट परिणाम करणारा ठरणार आहे.

आज 1 मे रोजी 19 किलो वजनाचा व्यावसायिक सिलिंडर तब्बल 17 रुपयांनी स्वस्त झाला आहे. कोलकातामध्ये या सिलिंडरची किंमत आता 1868.50 रुपयांवरून 1851.50 रुपये झाली आहे. मुंबईत त्याची किंमत 1713.50 ऐवजी आता 1699 रुपये इतकी झाली आहे. दिल्लीत हा सिलिंडर आता 1747.50 रुपयांना तर चेन्नईत 1914.50 रुपयांना उपलब्ध आहे. यामुळे व्यावसायिक वापरासाठी लागणारा एलपीजी गॅस खरेदी करणाऱ्यांना सध्याच्या महागाईच्या काळात काहीसा श्वास घेता येईल.

दुसरीकडे, घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती मात्र स्थिर आहेत. 8 एप्रिल रोजी सरकारने 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केली होती, जी जवळपास वर्षभरानंतर झाली होती. सध्या घरगुती गॅस दिल्लीमध्ये 853 रुपयांना, मुंबईत 852.50 रुपयांना, कोलकातामध्ये 879 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 868.50 रुपयांना मिळतो. त्यामुळे घरगुती ग्राहकांना तरी सध्या नव्याने दिलासा मिळालेला नाही.

उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी मात्र गॅस अजून स्वस्तात मिळत आहे. देशातील 33 कोटी एलपीजी कनेक्शनपैकी तब्बल 10.33 कोटी कनेक्शन उज्ज्वला योजनेअंतर्गत आहेत. या योजनेतील लाभार्थींना दर सिलिंडरवर 300 रुपयांची सवलत मिळते. मात्र दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये योजनेचा लाभ फारसा घेतला जात नसल्याचे आकडेवारीवरून दिसते. एलपीजी दरातील या नव्या बदलामुळे व्यावसायिकांसोबतच सरकारवरचा सबसिडीचा भारही काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number