घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांचे नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. नवी मुंबईत सिडकोच्यावतीने पाच हजार घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.
नवी मुंबईतील सिडकोची ५ हजार घरांसाठीची ही महागृहनिर्माण योजना असणार आहे. यामध्ये अत्यल्प उत्पन्न, अल्प उत्पन्न गटांमधील घरे उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच पुढील महिन्यात या अर्जप्रक्रियेला सुरूवात होणार आहे.
नवी मुंबईतील कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी आदी ठिकाणी ही घरे असणार आहेत. नवी मुंबईत सिडकोच्यावतीने पाच हजार घरांची ‘महागृहनिर्माण’ योजना आहे. या घरकुल योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी येथे घरे उपलब्ध होणार आहेत. या घरांसाठीच्या लॉटरीची प्रक्रिया जानेवारी २०२२पासून सुरू करण्यात येणार असल्याचे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले की, ‘नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्याकरिता सिडकोतर्फे जानेवारी २०२२मध्ये ५ हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेची लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या योजनेमुळे येणाऱ्या नविन वर्षात अनेक कुटुंबांचे आपल्या स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल, असा मला विश्वास वाटतो.’
नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्याकरिता @CIDCO_Ltdतर्फे जानेवारी२०२२मध्ये ५हजार घरांच्या ‘महागृहनिर्माण’ योजनेची लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.या योजनेमुळे येणाऱ्या नविन वर्षात अनेक कुटुंबांचे आपल्या स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल,असा मला विश्वास वाटतो. — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 14, 2021