‘भाजपाचे इतर राज्यातील कारनामे पहा’ – जितेंद्र आव्हाड

किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय मविआ सरकारने घेतला. मविआच्या वाईन विक्रीच्या निर्णयावर विरोधकांनी टीका केली आहे. दरम्यान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ‘वाईन विक्रीच्या निर्णयावर टीका करणाच्या भाजपाचे इतर राज्यातील कारनामे पहा’, अशी प्रतिक्रिया राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे. जितेंद्र […]

‘भाजपाचे इतर राज्यातील कारनामे पहा’ – जितेंद्र आव्हाड

किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय मविआ सरकारने घेतला. मविआच्या वाईन विक्रीच्या निर्णयावर विरोधकांनी टीका केली आहे. दरम्यान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ‘वाईन विक्रीच्या निर्णयावर टीका करणाच्या भाजपाचे इतर राज्यातील कारनामे पहा’, अशी प्रतिक्रिया राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, मध्यप्रदेशमध्ये घरात बार उघडायला परवानगी देण्यात आली असून देशाच्या तुलनेत मध्यप्रदेशमध्ये मद्यपेयांचे विक्री जास्त प्रमाणात केली जाते. त्यामुळे वाईन विक्रीच्या निर्णयावर टीका करणाऱ्या भाजपाचे इतर राज्यातील कारनामे पहा, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्यात ६०० दुकांनांमध्ये वाईनसाठी परवानगी मिळणार असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच वाईन आरोग्याला हानिकारक नसल्याचेही आव्हाड म्हणाले आहेत.

‘वाईन विक्रीचा विरोध फार चिंतेचा नाही’ – शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाईन विक्रीवर प्रतिक्रिया दिली आहे. वाईन विक्रीचा विरोध फार चिंतेचा नाही, असे शरद पवार म्हणाले. तसेच वाईन आणि इतर पेयांमधील फरक जाणून घेण्याची भूमिका घेतली पाहिजे. तसेच आज वाईन विक्रीचा निर्णय चिंताजनक असेल असे मला वाटत नाही. परंतु इतर राजकारण्यांना वाटत असेल तर राज्य सरकारने निर्णय बदलला तरी वाईट वाटायचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number