कोण नकली कोण बेअकली ? 

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळतोय. राज्यात शेवटच्या टप्प्याचं मतदान बाकी आहे २० मी रोजी राज्यात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्याच निमित्ताने प्रचार सुद्धा जोर

कोण नकली कोण बेअकली ? 

मुंबई, १६ मे २०२४, प्रतिनिधी : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळतोय. राज्यात शेवटच्या टप्प्याचं मतदान बाकी आहे २० मी रोजी राज्यात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्याच निमित्ताने प्रचार सुद्धा जोर धरू लागला आहे. पाचव्या टप्प्याच्या प्रचारानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी मुंबईत रोड शो केला त्याआधी नाशकात सभा घेतली आणि त्यांनी उद्धव यांच्यावर टीका केली आणि त्यांच्या शिउबाठा गटाला नकली शिवसेना म्हटले. याआधी सुद्धा मोदींनी उद्धव हे बाळासाहेबांचे नकली संतान असल्याची टीका केली होती…. त्यानंतर उद्धव यांच्याकडून उत्तर आलं काय हा नकली बेअकलीचा वाद आहे. कसा हा वाद सुरु झाला आणि काय शब्दबाण या निमित्ताने पाहायला मिळतायेत पाहुयात…. 

आंध्रप्रदेशमधील एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली आहे. कारण दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदी यांनी उद्धव यांच्यावर घणाघात केला आहे. आणि उद्धव यांची सेना नकली शिवसेना असल्याचे मोदी म्हणाले आणि उद्धव हे बाळासाहेबांचे नकली संतान असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी उद्धव यांच्यावर टीका केली दरम्यान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आपल्याला नकली म्हणणारे बेअकली’ असं म्हणत उद्धव यांनी बोचरी टीका केली आहे….

उद्धव बाळासाहेबांचे नकली संतान या टीकेवर उद्धव यांनी बुधवारी पुन्हा उत्तर दिले आणि राजकारणात भाजपला पोरंच होत नाही, म्हणून त्यांना सगळी नकली संताने म्हणजे आपल्याकडचे सुद्धा गद्दार मांडीवर घ्यावे लागले. असं म्हणत मोदींवर निशाणा साधला. मोदींच्या या वक्तव्यानंतर शिउबाठाचे खासदार संजय राऊत यांनी हा बाळासाहेबांचा अपमान असल्याचे म्हटले. तर फडणवीसांनी यावर उत्तर देत पंतप्रधान मोदी यांनी वारंवार सांगितले आहे की त्यांना बाळासाहेबांचा किती आदर आहे. आणि पंतप्रधान मोदी बाळासाहेबांचा कधीच अपमान करू शकत नाही. यानंतर पंतप्रधान मोदींची नाशकात जाहीर सभा झाली नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदार संघातील उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पुन्हा पंतप्रधान मोदींनी उद्धव यांच्यावर टीका करताना ज्या दिवशी नकली शिवसेनेचे विलीनीकरण हे काँग्रेसमध्ये होईल, त्या दिवशी मला सर्वात जास्त बाळासाहेब ठाकरे आठवण येईल. असं म्हणत उद्धव यांच्यावर निशाणा साधला. तर दुसरीकडे मोदी भाजपाला सोडून गेले तेव्हा भाजपाची काय दशा होईल हे आठवून मला दुःख होते असं म्हणत उद्धव यांनी मोदींच्या टीकेला उत्तर दिलं. 

नांदेडातल्या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवारांच्या एका मुलाखतीतल्या वक्तव्याचा दाखला देत शिउबाठा, आणि राशपला काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा ठाकरेंनी शिंदेंचं आणि शरद पवारांनी अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारावं असा सल्ला दिला होता. त्याच वक्तव्याला दुजोरा देत मोदींनी पुन्हा बुधवारी शिउबाठा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची भविष्यवाणी केली.   

शिउबाठा, आणि राशपला काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा ठाकरेंनी शिंदेंचं आणि शरद पवारांनी अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारावं असा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला होता. त्यावेळी नकली राष्ट्रवादी असा देखील उल्लेख मोदींनी केला होता त्यावर शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.  नकली म्हणण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला ? असं सवाल शरद पवारांनी उपस्थित केला.

कोण नकली आणि कोण असली याचा निर्णय जनताच करणार आहे. कारण यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरण बदललेली आहेत. आणि जे काळ विरोधात होते ते सोबत आहेत आणि जे काळ सोबत होते ते एकमेकांविरोधात निवडणूक लढवताना दितायेत आणि आरोप प्रत्यारोप करताना सुद्धा दिसतायेत.  नेमकं जनता कुणाला असली आणि कुणाला नकली ठरवणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार..

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number