Wondering Country: स्वतःचे विमानतळच काय तर चलनही नाही; तरीही ‘हा’ छोटासा देश आहे श्रीमंत, काय आहे यामागील गुपित?

सक्षम अर्थव्यवस्था, उच्च जीवनमान आणि पर्यटनामुळे हा देश जागतिक स्तरावर प्रगत आणि आकर्षक ठरला आहे.

Wondering Country: स्वतःचे विमानतळच काय तर चलनही नाही; तरीही ‘हा’ छोटासा देश आहे श्रीमंत, काय आहे यामागील गुपित?

युरोपच्या नकाशावर एक असा देश आहे, जो आकाराने लहान असला तरी संपन्नतेच्या बाबतीत मोठ्या देशांनाही मागे टाकतो. स्वतःची चलनव्यवस्था नाही, स्वतःचे विमानतळ नाही, तरीही हा देश जगातील श्रीमंत राष्ट्रांमध्ये गणला जातो. निसर्गसौंदर्य, शांतता आणि उच्च जीवनमान यांचा संगम असलेला लिक्टेनस्टाइन हा देश सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

लिक्टेनस्टाइन हा छोटेखानी देश स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया यांच्या दरम्यान वसलेला आहे. केवळ सुमारे 160 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आणि सुमारे 40 हजारांची लोकसंख्या असलेल्या या देशाने आर्थिक प्रगतीचे वेगळेच उदाहरण घालून दिले आहे. आकाराने लहान असला तरी आर्थिकदृष्ट्या तो अत्यंत सक्षम आणि स्थिर मानला जातो.

या देशाचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे विमानतळ नाही. पर्यटक आणि प्रवासी स्वित्झर्लंड किंवा ऑस्ट्रियातील विमानतळांचा वापर करून रस्ता किंवा रेल्वेमार्गे लिक्टेनस्टाइनमध्ये प्रवेश करतात. तरीही पर्यटनाच्या बाबतीत हा देश अत्यंत लोकप्रिय असून दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात.

हेही वाचा: Aamir Khan: 80 टक्के शूटिंग पूर्ण होऊनही आमिर खानचा 'हा' चित्रपट प्रदर्शित का नाही झाला?; बॉलिवूडमधील सर्वात महागडा चित्रपट अपूर्ण

लिक्टेनस्टाइनची आणखी एक विशेष बाब म्हणजे येथे स्वतःची चलनव्यवस्था नाही. येथे स्विस फ्रँक हेच अधिकृत चलन वापरले जाते. मात्र, याचा देशाच्या आर्थिक सामर्थ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. उलट, मजबूत आर्थिक धोरणांमुळे हा देश अधिक सक्षम बनला आहे.

या देशाच्या संपन्नतेमागे मजबूत बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र, अत्याधुनिक उत्पादन उद्योग आणि हाय-टेक वस्तूंची निर्यात ही प्रमुख कारणे आहेत. तसेच, कमी लोकसंख्या असल्यामुळे प्रति व्यक्ती उत्पन्नही मोठ्या प्रमाणात जास्त आहे. यामुळे नागरिकांचा जीवनमान अत्यंत उच्च दर्जाचे आहे.

लिक्टेनस्टाइनमध्ये गुन्हेगारी दर अत्यंत कमी आहे आणि रोजगाराच्या संधीही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर, काही क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांची संख्या ही लोकसंख्येपेक्षाही जास्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा देश केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही प्रगत मानला जातो.

लिक्टेनस्टाइन हा देश आकाराने छोटा असला तरी प्रगती, संपन्नता आणि निसर्गसौंदर्य यांचा अद्भुत मिलाफ आहे. आधुनिक जगातही साधेपणा आणि शाश्वत विकास कसा साधता येतो, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे. 

हेही वाचा: Nagpur Found Dead Body : नागपूर हादरलं! तीन दिवसांपासून बेपत्ता, अन् हात-पाय बांधून पोत्यात सापडला 14 वर्षीय अथर्व मृतदेह

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number