एलआयसीला ८७,५०० कोटींचा फटका

देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ कंपनीला शेअर बाजारात अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेअर बाजारात मोठी संस्थात्मक गुंतवणुकदार असलेल्या एलआयसीला शेअर बाजारातील लिस्टिंगपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. डिस्काउंट दरात लिस्ट झालेल्या एलआयसीच्या शेअर दरात घसरण होत आहे. एलआयसीच्या गुंतवणुकदारांना ८७,५००कोटींचा फटका बसला आहे. लिस्टिंगच्या वेळेस बाजार भांडवलानुसार एलआयसी ही पाचवी […]

एलआयसीला ८७,५०० कोटींचा फटका

देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ कंपनीला शेअर बाजारात अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेअर बाजारात मोठी संस्थात्मक गुंतवणुकदार असलेल्या एलआयसीला शेअर बाजारातील लिस्टिंगपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. डिस्काउंट दरात लिस्ट झालेल्या एलआयसीच्या शेअर दरात घसरण होत आहे. एलआयसीच्या गुंतवणुकदारांना ८७,५००कोटींचा फटका बसला आहे. लिस्टिंगच्या वेळेस बाजार भांडवलानुसार एलआयसी ही पाचवी मोठी कंपनी होती. आता एलआयसीच्या स्थानात घसरण झाली असून आयसीआयसीआय बँकेपेक्षाही कमी बाजार भांडवल झाले आहे.

गुरुवारी एलआयसीच्या शेअर दरात किंचित घसरण दिसून येत आहे. गुरुवारी एलआयसीचा शेअर ८०९ रुपयांवर व्यवहार करत होता. बुधवारी एलआयसीचा शेअर ८१०.५५ रुपयांवर बंद झाला होता. बुधवारी या शेअरने ८१७ रुपयांचा दिवसातील उच्चांक गाठला होता. एलआयसीच्या शेअर दरात होत असलेल्या घसरणीचा परिणाम बाजार भांडवलावरही झाला आहे. बुधवारी एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य ५,१२,६७२ कोटींच्या आसपास झाले.

भारतीय आयुर्विमा महामंडळ कंपनी ही भारतातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापक आहे. एलआयसीच्या अखत्यारीत अब्जावधींची मालमत्ता आहे. त्याशिवाय एलआयसी ही भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी गुंतवणुकदार संस्था आहे. एलआयसीकडून जवळपास २५ टक्के इक्विटीमध्ये गुंतवणूक होते, असे एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक राज कुमार यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number