पदवीधर निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रचाराचा शनिवार हा शेवटचा दिवस असून ३० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसह भाजपची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे समोर आले आहे. तर शेवटच्या दिवशी सत्यजित तांबे विरूद्ध शुभांगी पाटील प्रचारात अटीतटीचा सामना होणार आहे. नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा जाहीर करणार का? याकडे साऱ्या राज्याचे […]

पदवीधर निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रचाराचा शनिवार हा शेवटचा दिवस असून ३० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसह भाजपची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे समोर आले आहे. तर शेवटच्या दिवशी सत्यजित तांबे विरूद्ध शुभांगी पाटील प्रचारात अटीतटीचा सामना होणार आहे.
नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा जाहीर करणार का? याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी पत्र पाठवणार, कसबा आणि चिंचवडबाबत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले असून मोठ्या भेटीगाठीही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुकांना शनिवारी दुपारपर्यंत अर्ज पाठवण्याच्या सूचना असून मुलाखतीनंतर उमेदवार ठरणार आहे. तर कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून केंद्रीय निवड समितीला ५ नावांचा प्रस्ताव देण्यात आला असून यामध्ये शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांच्या नावांचा सहभाग असल्याची माहिती मिळते आहे. सी व्होटर्सच्या सर्वेनुसार महाविकास आघाडीला लोकसभेत ३४ जागा मिळणार असल्याचे समोर आले असून सी व्होटर्सच्या सर्वेवरून ठाकरे आणि शिंदे गटात एकच खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number