Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा दोन महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार? काय आहे अपडेट

आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा दोन महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार? काय आहे अपडेट

महाराष्ट्रात सध्या लाडकी बहिण योजना चांगलीच चर्चेत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. अशातच आता मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  मार्च महिना संपून गेला तरीही पैसे न आल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 फेब्रुवारीचा हप्तादेखील मार्च महिन्यात देण्यात आला होता. मार्चचा हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यानंतर परत एप्रिलच्या हप्त्याबाबतही चर्चा होत आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात या महिन्यात 3000 रुपये एकत्र येऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

हेही वाचा – Toll Exemption: महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेसह राज्यातील सहा प्रमुख महामार्गांवर 'या' वाहनांना 'टोलमाफी' 

लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांचे अर्ज बाद केले आहेत. जवळपास 71 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. यामध्ये काही महिला अपात्र ठरल्या आहेत तर काहींनी केवायसी केलेली नाही. या महिलांना योजनेतून बाद केले आहे. त्यामुळे त्यांना 1500 रुपये मिळणार नाही.

हेही वाचा – Anjali Damania On Rupali Chakankar : चाकणकरांचे 177 कॉल्स, साडे नऊ तास फोनवरून संवाद…; दमानियांच्या हाती खरातच्या फोनचा CDR 

लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ईकेवायसीची मुदत वाढवण्यात आली आहे. ईकेवायसीची मुदत तिसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे. 30 एप्रिलपर्यंत महिला केवायसीमध्ये दुरुस्ती करु शकतात. ज्या महिलांनी ईकेवायसीमध्ये चूक केली आहे त्या दुरुस्ती करु शकतात.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number