Ladki Bahin Yojana: ‘तो’ एक प्रश्न आणि लाडकी बहीण अपात्र! लाभार्थ्यांची संख्या 86 लाखांनी घटली, समोर मोठं प्रश्नचिन्ह

या योजनेसाठी 2.4 कोटींहून अधिक महिलांची नोंदणी झाली होती. मात्र, डिसेंबर 2025 च्या हप्त्यावेळी ही संख्या केवळ 1.6 कोटींवर आली आहे.

Ladki Bahin Yojana: ‘तो’ एक प्रश्न आणि लाडकी बहीण अपात्र!  लाभार्थ्यांची संख्या 86 लाखांनी घटली, समोर मोठं प्रश्नचिन्ह

लाडकी बहिण योजना ही आतापर्यंत नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. प्रशासनाने या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी इकेवायसी करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. मात्र सध्या लाडक्या बहिणींची संख्या कमी होत आहे.  ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया सुरू केल्यानंतर लाभार्थी महिलांच्या संख्येत 86 लाखांची मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. या योजनेसाठी 2.4 कोटींहून अधिक महिलांची नोंदणी झाली होती. मात्र, डिसेंबर 2025 च्या हप्त्यावेळी ही संख्या केवळ 1.6 कोटींवर आली आहे.

31 डिसेंबर 2025 पर्यंत केवळ 1.9 कोटी महिलांनी ई-केवायसी कागदपत्रे सादर केली होती. 1.9 कोटींपैकी केवळ 1.6 कोटी महिलांची माहिती अचूक आढळल्याने त्यांनाच जानेवारीच्या मध्यात डिसेंबरचा हप्ता मिळाला. उर्वरित महिलांच्या अर्जात त्रुटी आढळल्या आहेत.

हेही वाचा – Vaishno Devi Mandir: वैष्णोदेवी मंदिरात व्हिडीओ बनवणे पडणार महागात; छुपा कॅमेरा वापरणाऱ्यांवर थेट… 

ई-केवायसी फॉर्ममधील एका गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नामुळे लाखो पात्र महिला योजनेतून बाहेर पडल्या आहेत. फॉर्ममध्ये "तुमच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत नाही ना?" असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यांच्या घरी कोणीही सरकारी नोकरीत नाही, अशा अनेक महिलांनी गोंधळून 'हो' असे उत्तर दिले. 

हेही वाचा – Thane-Nashik Highway: प्रशासनाचा मोठा निर्णय ! ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार, अखेर 'तो' पुल केला सुरू

नियमानुसार सरकारी नोकरी असल्यास योजना लागू होत नाही, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्या अपात्र ठरल्या. ज्या महिलांच्या अर्जात अशा चुका झाल्या आहेत, त्यांना  31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाइन पोर्टलवरून दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आली आहे.  जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता 18 फेब्रुवारीपर्यंत महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. वित्त विभागाकडून विविध विभागांकडे निधी वर्ग करण्यास उशीर होत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number