राज्यात लाडकी बहिण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पण या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी इ-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ईकेवायसी करण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे.त्यानंतर कोणालाच नव्याने ईकेवायसी करण्यास मिळणार नाही असं स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, ईकेवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची संधी मात्र महिलांना मिळणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी ईकेवायसीमध्ये काही चुकीची माहिती दिली असेल तर ती दुरुस्त करण्याची संधी आहे.
ई-केवायसी करताना महिलांच्या काही प्रमाणात चुका झाल्या. या कारणास्तव महिलांना या योजनेचा लाभ मिळणे बंद झाले. मात्र ही चूक सुधारता यावी यासाठी पुन्हा संधी मिळाली आहे. केवायसीमध्ये ऑनलाइन पद्धतीने दुरुस्ती करावी लागणार आहे, असंदेखील स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्याने लाडकी बहिण योजनेत ईकेवायसी करण्याची शेवटची संधी 31 डिसेंबर होती. मात्र या तारखेनंतर नवीन केवायसी करणं बंद करण्यात आलं आहे. ही तारीख 31 मार्च करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढच्या 20 दिवसांमध्ये ही ईकेवायसी करावी लागणार आहे. अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
हेही वाचा – Flight Cancellation: युद्धाची झळ आकाशाला! भारताची शेकडो विमानं अडकली, DGCA चा मोठा निर्णय
ईकेवायसीत दुरुस्ती कशी करावी?
सर्वात आधी https://ladakibahin.maharashtra.gov.in/वेबसाइटवर जावे
यानंतर ज्या लाभार्थ्यांकडून ईकेवायसीमध्ये चुकीचे पर्याय निवडण्यात आले आहेत, यावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे विचारली जातील. या प्रश्नांची योग्य उत्तरे द्यावी.
तुमची केवायसी पूर्ण झाल्यानंतर मेसेज येईल. यानंतर तुम्हाला लाभ मिळणे पुन्हा सुरु होईल.