Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खुशखबर! खात्यात ‘या’ महिन्याचे पैसे जमा झाले का? लगेचच चेक करा

महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरूवात झाली आहे.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खुशखबर! खात्यात ‘या’ महिन्याचे पैसे जमा झाले का? लगेचच चेक करा

लाडकी बहिण योजनेचा हप्ता खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र आता ती चिंता दूर झाली आहे.  लाभार्थी महिलांच्या खात्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरूवात झाली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना यामुळं दिलासा मिळाला आहे. सोमवारी रात्रीपासून महिलांच्या खात्यात जानेवारीच्या हप्त्याची रक्कम म्हणजेच 1500 रूपये जमा झाल्याचे मेसेज येत आहेत.  महिला व बाल विकास विभागानं सोमवारपासून जानेवारीच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

 हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar Crime: पैशासाठी वाट्टेल ते! आईवडिलांच्या निधनानंतर प्रॉपर्टीसाठी बहिणींनी भावासोबत केलं नको ते कृत्य, वाचा नेमकं काय घडलं? 

राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना ई केवायसी करणं बंधनकारक केलं होतं. त्यानंतर लाडक्या बहिणींच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जुलै 2024 पासून जानेवारी 2026 चा हप्ता विचारात घेतल्यास 19 हप्ते खात्यात जमा झाले आहेत. 

 हेही वाचा – Budget Session 2026: विधानसभेत हायव्होल्टेज ड्रामा! धनंजय मुंडेंना विधानसभा अध्यक्षांनी सुनावलं; सभागृहात नेमकं काय घडलं? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडून ई केवायसी प्रक्रिया करताना चुकीचे पर्याय निवडले गेले होते. त्यामुळं महिला लाभार्थ्यांना 31 मार्च 2026 पर्यंत ई केवायसी दुरुस्तीची संधी दिली आहे. आता ई केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडणाऱ्या महिलांना दुरुस्तीची शेवटची संधी देण्यात आली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number