Ladki Bahin Yojana E-Kyc : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! आता ई-केवायसी करताना काळजी घेण्याचे आदिती तटकरेंचे आवाहन

आता या पार्श्वभूमीवर सरकारने लाडक्या बहिणींना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. 

Ladki Bahin Yojana E-Kyc : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी!  आता ई-केवायसी करताना काळजी घेण्याचे आदिती तटकरेंचे आवाहन

महाराष्ट्रात सध्या लाडकी बहिण योजना मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. का ल जळगावातून लाडकी बहिण ई-केवायसी संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली. ई-केवायसी करून देण्याच्या बहाण्याने एका नराधामाने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. याप्रकरणी एका इसमावर गुन्हा दाखल झाला आहे. राज्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. आता या पार्श्वभूमीवर सरकारने लाडक्या बहिणींना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. मात्र, ई केवायसी करताना काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

हेही वाचा – Asha Bhosle Late Rites : …आणि शेवटी त्यांनी रडवलंच; गानसम्राज्ञी आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकिय इतमामात अंत्यसंस्कार 

मात्र या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसून, महिला मोबाईलवरून स्वतः ई- केवायसी करू शकतात किंवा जवळील अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकतात, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

हेही वाचा – Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' तारखेला संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद; दुरुस्ती कामामुळे घेण्यात आला निर्णय 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number