भारतीय जनता पार्टीचे आमदार कृष्णा खोपडे आणि आमदार प्रवीण दटके यांनी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात विशेष लक्षवेधी सूचना मांडत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. भाजप आमदार खोपडे म्हणाले, “तुकाराम मुंढे हे 2020 मध्ये सहा महिने नागपुरात होते. स्मार्ट सिटीचे अधिकार नसतानाही गैरवापर केला. महिला कर्मचाऱ्यांनी सही केली नाही म्हणून स्वत:च्या कक्षात बोलावून शिवीगाळ केली”.
पुढे ते म्हणाले की, “महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर संदीप जाधव यांच्या कार्यकाळात महिलेने सदर पोलिस स्टेशन येथे तक्रार केली. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख असल्याने कारवाई झाली नाही. माहिती खंडपीठाच्या आयोगानेही शासनाला कारवाई करण्याचा आदेश दिला होता. पण, कारवाई झाली. त्यामुळे मी आणि आमदार प्रवीण दटके यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी करणारी लक्षवेधी आणली आहे,” अशी भूमिका खोपडे यांनी मांडली आहे.