Krishna Asthikar : बापाच्या मनसुब्यांना सुरुंग?, कृष्णा आष्टीकर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी; आगामी निवडणुकीत अनोखा पेच

महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर' यशस्वी ठरल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे त्यांनी ठाकरेंची साथ सोडली असताना दुसरीकडे कृष्णा आष्टीकर यांनी वडिलांच्या मनसुब्यांना सुरुंग लावलाय.

Krishna Asthikar : बापाच्या मनसुब्यांना सुरुंग?, कृष्णा आष्टीकर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी; आगामी निवडणुकीत अनोखा पेच

दिल्लीमध्ये घडलेल्या अत्यंत वेगवान घडामोडींनंतर पक्षाचे अनेक खासदार नेतृत्वावर नाराज असून ते बाहेर पडू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. अशातच आज महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी ठरल्यानंतर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 9 पैकी 6 खासदारांनी बंड पुकारत आपला वेगळा गट स्थापन केला असून, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गटाला अधिकृत मंजुरीही दिली आहे. महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगरला घेऊन खूप मोठ्या घडामोडी घडत असून हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे देखील या वेगळ्या गटात सामील झाले आहेत. 

एकीकडे त्यांनी ठाकरेंची साथ सोडली असताना दुसरीकडे त्यांचे सुपुत्र कृष्णा आष्टीकर यांनी वडिलांच्या मनसुब्यांना सुरुंग लावल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटातून जे खासदार फुटले आहेत, त्यांच्यामध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा देखील समावेश आहे. याचपार्श्वभूमिवर कृष्णा पाटील आष्टीकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आपण ठाकरेंना सोडून कुठेही जात नसून आघाडीतच राहणार असल्याचा दावा कृष्णा आष्टीकर यांनी ठोकला आहे. कृष्णा पाटील आष्टीकर यांनी वडिलांच्या भूमिकेच्या पूर्णपणे विरुद्ध जात, आपण उद्धव ठाकरेंसोबतच ठाम असल्याचे जाहीर केले आहे. 

हेही वाचा- Naresh Mhaske : खासदारांनंतर आता नगरसेवकही शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर? लवकरच ‘ऑपरेशन टायगर 3’; म्हस्केंचा दावा

कृष्णा आष्टीकर यांचा उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा
यावेळी ते म्हणाले की, “मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, आघाडीचा होतो आणि आघाडीचाच राहणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्हीच विजयी होणार. कुठली तरी बातमी आली आणि माझ्यावर शंका उपस्थित केली जात आहे. मी उद्धव साहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. हा पळून जाणार गडी नसून मैदान मारणारा गडी आहे. निवडणुकीच्या रिंगणात मी कालही पाय रोवून उभा होतो आणि आजही पूर्ण ताकदीने तयार आहे. समोरच्यांना आवाहन पेलावत नसल्याने संभ्रम पसरविला जातो आहे. भूलथाप्पांना बळी पडू नका.” अशी भूमिका कृष्णा पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केली आहे. कृष्णा पाटील आष्टीकर हे नांदेड विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. 

हेही वाचा- Ravi Rana On Shivsena UBT Operation Tiger : “ठाकरेंचे 2 खासदार माझ्या संपर्कात” रवी राणा यांचा खळबळजनक दावा

आगामी निवडणुकांमध्ये आणखी एक कौटुंबिक लढाई
राज्याच्या राजकारणाक याआधी देखील अनेक कौटुंबिक दावेदार आमनेसामने आले आहेत आणि त्यांच्यात चुरसीच्या लढाया पाहायला मिळाल्या आहेत. असं असताना आता हिंगोली आणि नांदेडमधील आगामी निवडणुकांसाठी आष्टीकर कुटुंबाची भर पडली आहे. 6 बंडखोर खासदारांच्या यादीत हिंगोलीचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे देखील नाव असून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. दुसरीकडे, त्यांचे चिरंजीव कृष्णा आष्टीकर हे ठाकरे गटाचे (मविआ) उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करतील अशा चर्चा रंगल्या आहेत. या अनोख्या पेचामुळे हिंगोली आणि नांदेडमधील आगामी निवडणुका अत्यंत रंजक ठरणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number