छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणातून एक अत्यंत नाट्यमय आणि राजकीय थरार उघडकीस आला आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय पक्षांमध्ये प्रचंड उलथापालथ पाहायला मिळाली. ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत पक्षाला मोठा धक्का देण्याचा प्रयत्न केला. कृष्णा डोणगावकर व देवयानी डोणगावकर (छत्रपती संभाजी नगर) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्या बद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, डोणगावकर यांनी अचानक माघार घेतली असली तरी ठाकरे गटाने कमालीच्या सावधगिरीने खेळलेल्या ‘बॅकअप प्लॅन’मुळे महाविकास आघाडीची अब्रू वाचली. आता छत्रपती संभाजीनगर-जालना विधान परिषदेसाठी गणेश लोखंडे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार असतील, असे जाहीर करण्यात आले आहे.
कृष्णा डोंनगावकर व देवयानी डोनगावकर (छत्रपती संभाजी नगर)यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे,
पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्या बद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे, — Sanjay Raut (@rautsanjay61) June 4, 2026