कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समन्स पाठवले आहेत. कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी आता शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. त्यानुसार येत्या २३ फेब्रुवारी रोजी चौकशी आयोगासमोर शरद पवार साक्ष नोंदवणार आहेत.
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांच्यासह तत्कालीन पोलीस अधिक्षक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनाही समन्स पाठवण्यात आले आहे. तर २३ फेब्रुवारी रोजी शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार आहे.
१ जानेवारी २०१८ रोजी पुण्याजवळीत कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार झाला होता. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने चौकशी आयोगाची नेमणूक केली. तसेच याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भीमा कोरेगाव येथील हिंसाचार संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे झाले असल्याचे विधान केले. त्यामुळे याप्रकरणी शरद पवार यांची साक्ष नोंदवण्याची मागणी वकील प्रदीप गावडे यांनी केली होती. त्यानंतर आता शरद पवारांना कोरेगाव-भीमाप्रकरणी चौकशी आयोगाकडून समन्स बजावण्यात आले असून २३ फेब्रुवारी रोजी शरद पवार चौकशी आयोगासमोर साक्ष नोंदवणार आहेत.