कोकण विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजय भावे

मागील काही काळापासून या विद्यापीठांच्या कुलगुरुंची पदे रिक्त होती. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ, तर डॉ सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ संजय भावे कोकण कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरु असणार आहेत. राज्यपालांनी डॉ. संजय घनश्याम भावे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे. […]

कोकण विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजय भावे

मागील काही काळापासून या विद्यापीठांच्या कुलगुरुंची पदे रिक्त होती. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ, तर डॉ सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ संजय भावे कोकण कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरु असणार आहेत.

राज्यपालांनी डॉ. संजय घनश्याम भावे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे. तसेच डॉ. रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. तर डॉ. सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ. संजय भावे हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे अॅग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.

रवींद्र कुलकर्णी हे मुंबईतील माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील (आयसीटी) प्राध्यापक आणि विभागप्रमुख कार्यरत होते. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या काळात डॉ रवींद्र कुलकर्णी यांनी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणून कारभार सांभाळलेला आहे. त्यामुळे डॉ. रवींद्र कुलकर्णी हे कुलगुरू निवडीच्या शर्यतीत इतरांपेक्षा सरस मानले जात होते.

डॉ. सुरेश गोसावी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. डॉ. गोसावी यांनी एमएस्सी. पीएच. डी. पदवी मिळवली असून त्यांनी विविध विषयांमध्ये संशोधन पेपर सादर केले आहेत. तर प्लाझ्मा पॉलिमरायझेशन वापरून लिथोग्राफी आणि नमुना हस्तांतरण, ड्राय इलेक्ट्रॉन बीम संश्लेषण, मल्टी-इलेक्ट्रॉन बीम लिथोग्राफी सिस्टम डिझाइन, नॅनोमटेरियल्स, नॅनोटेक्नॉलॉजी मायक्रो फ्लुइड क्स, सॉफ्ट लिथोग्राफी हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते.

महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलांना राज्यपालांनी मान्यता न दिली नव्हती. त्यामुळे कुलगुरू निवड प्रक्रिया रखडली होती. मागील वर्षी राज्यात जुलैमध्ये सत्तांतर झाल्यानंतर राज्य सरकारने विद्यापीठ कायद्यातील प्रस्तावित बदल रद्द केले. विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रिया रखडल्याने, विद्यापीठाला शैक्षणिक निर्णय घेण्यात अडचणी येतात, तसेच शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा मुद्दा वारंवार अधोरेखित केला जात होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी ९० अर्ज आले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number