कोकणातील विधानपरिषदेच्या जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादीत रणकंदन सुरू असताना कोणाला ही जागा मिळणार अशी चर्चा सुरू होती, आता ही जागा जवळजवळ राष्ट्रवादीला गेल्याचे निश्चित झालं आहे. मागील दीडवर्षांपासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू होती. अशातच रायगड रत्नागिरीची परिषदेची जागा राष्ट्रवादीला सुटल्याने त्या बदल्यात शिवसेनेकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री गेल्याचे म्हटले जात आहे.
यावर मंत्री भरत गोगावले यांनी सूचक विधान केलं असून याबाबत आमचे नेते एकनाथ शिंदे निर्णय घेतील आणि त्याप्रमाणे आम्ही काम करू असे वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे. अनिकेत तटकरे आणि सुनील तटकरे यांनी एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या घेतलेल्या भेटीनंतर गोगावले यांनी याबाबत बोलताना राज्यात दोन जागा राष्ट्रवादीला मिळत असून पुणे आणि रायगड मधील जागेवर राष्ट्रवादीला गेल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
मात्र या जागेबाबत आज निर्णय होईल अस सुद्धा ते म्हणाले. मात्र, या बदल्यात रायगडचे पालकमंत्री मिळण्यावरून आज यावर देखील मार्ग निघणार असल्याचे त्यांनी सूचक विधान केलं आहे. शिवसेनेतील उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करावे लागणार आहे आणि शिवसेनेत आम्ही या आदेशांचे पालन करतो अस म्हणत गोगावले यांनी यावर सौम्य पद्धतीने बोलणे पसंद केलं आहे.