जनसुराज्यच्या संताजी घोरपडेंवर प्राणघातक हल्ला

करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला.

जनसुराज्यच्या संताजी घोरपडेंवर प्राणघातक हल्ला

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. घोरपडे रविवारी रात्री प्रचार संपवून सहकाऱ्यांसह कोल्हापूरकडे परत येत होते. त्यावेळी मनवाड येथे सहा ते सात जणांनी त्यांची कार अडवली. पक्षाचे कार्यकर्ते आहेत असे समजून घोरपडे कारमधून बाहेर उतरले आणि कार अडवणाऱ्यांशी बोलायला गेले. त्यावेळी बाहेरील लोकांनी काठ्या आणि भाल्यासह संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला केला. 

संताजी घोरपडे यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांवरही धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात संताजी घोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या डोक्यातून आणि हातामधून रक्तस्राव होत होता. मारेकऱ्यांचा हल्ला संताजी घोरपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या परीने परतावून लावला. त्यानंतर हल्लेखोर रस्त्यालगत असणाऱ्या शेतात पळून गेले. जाताना त्यांनी संताजी घोरपडे यांच्या गाडीवर दगडफेक केली. 

संताजी घोरपडे आणि त्यांचे सहकारी कोल्हापूरमध्ये परतले. यानंतर संताजी घोरपडे यांच्या डोक्यातून आणि हातातून रक्त वाहत असतानाचे फोटो कोल्हापूरमध्ये व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी कळे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी हल्ला प्रकरणी तपास सुरू केला आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number