विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी आज विधानसभा न लढता पुतण्या ऋतुराज पाटील यांची दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषणा केली. सतीश पाटील विधानपरिषदेचे आमदार असल्यामुळे आणि त्यांचा कार्यकाळ अजून तीन वर्षे शिल्लक असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा पेच निर्माण झाला होता.
कोणत्याही परिस्थितीत दक्षिण विधानसभा निवडणूक लढण्याचा पवित्रा घेतलेल्या सतेज पाटलांची यामुळे कोंडी झाली होती. अखेर आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेत सतेज पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या मतदारसंघातून ऋतुराज पाटील यांची उमेदवारी घोषित केली तर काँग्रेस सोडणार नसल्याचेही स्पष्ट केलं.
या मतदारसंघात सतेज पाटील यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी महाडिक कुटुंबियांशी नेहमीच सामना होतो. सध्या या मतदारसंघात भाजपाकडून अमोल महाडिक हे विद्यमान आमदार आहेत आता त्यांच्याशी ऋतुराज पाटील यांचा सामना होणार आहे.
ऋतुराज संजय पाटील हे डी वाय पाटील ग्रुपमधील प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय डी.पाटील यांचा मुलगा तसेच विधानपरिषदेचे सदस्य सतेज पाटील यांचा पुतण्या आहे.
संजय पाटील हे डॉ. वाय पाटील, डी वाय पाटील शिक्षण संस्थांचे संस्थापक अध्यक्ष असून ही पश्चिम भारतातील सर्वात ही मोठी शिक्षणसंस्था आहे.
त्यांनी वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए पूर्ण केले असून अमेरिकेच्या पेनसिल्व्हानिया, लेह विद्यापीठातून ग्लोबल बिझनेस या विषयात शिक्षण घेतले आहे.
ऋतुराज संजय पाटील यांना कोल्हापूरचे यूथ आयकॉन म्हणून ओळखले जाते. ते कोल्हापूर शहरातील बहुतेक सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत असतात.
त्यामुळे ते त्यांचे काका सतेज पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत कोल्हापूरातील राजकारणात पाऊल ठेवणार हे निश्चित मानलं जात आहे.
इनोव्हेशन, तंत्रज्ञानाचा वापर आणि चांगल्या नियोजनावर चालणार त्यांच व्यक्तीमत्व आहे. असं त्यांच्याबद्दल बोललं जात.