पन्हाळ्याकडे जाणारा मुख्य मार्ग पुर्णपणे खचला, पर्यटनव्यवसाय ठप्प

कोल्हापुरात झालेल्या अतिवृष्टीने ऐतिहासिक पन्हाळगडाकडे जाणारा मार्ग खचला असून  हा मार्ग पुर्वपदावर यायला अद्यापही पाच ते दहा दिवस लागणार आहेत. पन्हाळ्याकडे येणारा मुख्य मार्ग खचल्याने तर नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक साहित्य संपत आले असून त्यांची मोठी अडचण होत आहे. तर नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक साहित्य संपत आले असून त्यांची मोठी अडचण होत आहे. पन्हाळ्याकडे  जाणारा मुख्य मार्ग […]

पन्हाळ्याकडे जाणारा मुख्य मार्ग पुर्णपणे खचला, पर्यटनव्यवसाय ठप्प

कोल्हापुरात झालेल्या अतिवृष्टीने ऐतिहासिक पन्हाळगडाकडे जाणारा मार्ग खचला असून  हा मार्ग पुर्वपदावर यायला अद्यापही पाच ते दहा दिवस लागणार आहेत. पन्हाळ्याकडे येणारा मुख्य मार्ग खचल्याने तर नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक साहित्य संपत आले असून त्यांची मोठी अडचण होत आहे. तर नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक साहित्य संपत आले असून त्यांची मोठी अडचण होत आहे.

पन्हाळ्याकडे  जाणारा मुख्य मार्ग पुर्णपणे खचला

पन्हाळ्याकडे जाणारा मुख्य मार्ग पुर्णपणे खचला आहे. मात्र कोल्हापुरात झालेल्या अतिवृष्टीने हा मार्ग बुधवार पेठ नजीक खचला आहे. तर मोठी दरड सुद्धा या रस्त्यावर कोसळून तो वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे पन्हाळगडकडे जाणारी सर्व वाहतूक थांबवण्यात अली असून स्थानिकांना पायपीट करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या ज्वलंत इतिहासाची साक्ष देणाऱ्या पन्हाळ्यावर दर शनिवारी,रविवारी मोठया संख्येने पर्यटक येत असतात. शिवाय इथं तहसीलदार कार्यालय,पोलीस ठाणे,ग्रामीण रुग्णालय, नगरपरिषद, न्यायालय असल्याने तालुक्यातील लोकही विविध कामासाठी येत असतात. मात्र मुख्य मार्ग खचल्याने पन्हाळ्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या सगळ्या बाबींचा पर्यटन व्यवसायावर सुद्धा मोठा परिणाम जाणवत असून व्यवसायिकांना बसून राहण्याची वेळ आली आहे. तर नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक साहित्य संपत आले असून त्यांची मोठी अडचण होत आहे.

हा रस्ता दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे मात्र रस्ता खचण्याची तीव्रता पाहता त्याला आणखी 5 ते 10 दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याची चाचणी घेऊन तो खुला केला जाणार आहे. मात्र तोपर्यंत इथल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number