कोल्हापूरचे भाजपा जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे संपर्काबाहेर

कट्टर विरोधक मुश्रीफांना मंत्रीपद मिळाल्याने कोल्हापूर भाजपा जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे नाराज असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. राज्यातील सत्ता नाट्यानंतर कोल्हापूर भाजपा जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे. मुश्रीफांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं घाटगे नाराज आहेत. दोन दिवसांपासून घाटगे संपर्काबाहेर आहेत. घाटगे समर्थकांचं समाज माध्यमांवर जोरदार कॅम्पेनिंग सुरु आहे. कट्टर विरोधक असलेल्या हसन मुश्रीफ यांना […]

कोल्हापूरचे भाजपा जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे संपर्काबाहेर

कट्टर विरोधक मुश्रीफांना मंत्रीपद मिळाल्याने कोल्हापूर भाजपा जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे नाराज असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. राज्यातील सत्ता नाट्यानंतर कोल्हापूर भाजपा जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे. मुश्रीफांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं घाटगे नाराज आहेत. दोन दिवसांपासून घाटगे संपर्काबाहेर आहेत. घाटगे समर्थकांचं समाज माध्यमांवर जोरदार कॅम्पेनिंग सुरु आहे.

कट्टर विरोधक असलेल्या हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळाल्याने समरजित घाटगे आणि त्यांच्या समर्थकांची कोंडी झाली आहे. ‘आम्ही राजेंसोबत…, राजे ठरवतील तो पक्ष, ठरवतील ते धोरण’ असे म्हणत समर्थकांनी घाटगे यांना पाठिंबा दर्शवला आहे. समरजित घाटगे आता काय भूमिका घेणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number