शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी संध्याकाळी उशिरा आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र एवढ्यात त्यांच्यावरील टांगती तलवार काही गेली नाही. राजीनामा दिल्यानंतर ही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचे पथक 18 डिसेंबर रोजी रात्री मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल झाले.
हेही वाचा- 1995 ची केस, 2025 ला कारवाई; माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाणारं नेमकं प्रकरण काय?
माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट निघाल्यानंतर नाशिक पोलिसांची एकूण 13 जणांची टीम मुंबईत दाखल झाली. माणिकराव कोकाटे यांना 17 डिसेंबर रोजी काल दुपारी लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे नाशिक पोलिस दलातून सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके हे पथकप्रमुख असून गुन्हे शाखा युनिट-1चे पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल तसेच अधिकारी, कर्मचारी यांचे पथक लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा करून कोकाटे यांच्या अटकेबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही. या कायदेशीर घडामोडींमध्ये, कोकाटे यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोकाटे यांच्या कायदेशीर पथकाने न्यायालयाला सांगितले की ते सध्या सरकारी रुग्णालयात दाखल आहेत. त्याने त्याच्या अटकेला चार दिवसांची स्थगिती देण्याची विनंती केली, परंतु न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला की कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र दिले गेले नाही आणि सत्र न्यायालयाच्या निर्णयादरम्यान तो उपस्थित असायला हवा होता. माणिकराव कोकाटे यांना लिलावती रुग्णालयात जाखल केल्यानंतर तेथील वैद्यकिय अहवाल पाहून डॉक्टरांचा सल्ला घेऊन पोलिस पुढे कारवाई करण्याबाबत निर्णय घेतील. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना अटक करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाल्याचे स्पष्ट दिसत आहे.