मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. कोहिनूर मिल प्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात  आले आहेत. असं सांगण्यात आलं आहें “जर सरकार सत्याचं असेल, तर पहिलं मुंबई बॅंकेत काहिशे कोटींचा घोटाळा करणा-या भाजपाच्या आमदारांची चौकशी करा.. नोटीस काढायची गरजपण लागणारं नाही, अर्ध्यापेक्षा […]

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. कोहिनूर मिल प्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात  आले आहेत. असं सांगण्यात आलं आहें
“जर सरकार सत्याचं असेल, तर पहिलं मुंबई बॅंकेत काहिशे कोटींचा घोटाळा करणा-या भाजपाच्या आमदारांची चौकशी करा.. नोटीस काढायची गरजपण लागणारं नाही, अर्ध्यापेक्षा भाजपाचे घोटाळेबाज आमदार जेलमध्ये असतील…”मनसेचे कार्यकर्ते संदीप देशपांडे यांनी असे ट्विट त्यांनी केलं आहे.
‌काय आहे कोहीनूर मिल प्रकरण?

‌दादर येथील कोईनूर मिलची खरेदी शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, अधिक शिरोडकर व राज ठाकरे यांच्या भागीदारीतून करण्यात आलेली होती. ‌कोहीनूर मिल जागा-३ च्या खरेदी २१२१ कोटीमध्ये करण्यात आली होती.
‌कंपनी कर्जात गेल्यानंतर राज ठाकरे व शिरोडकर यांनी ९० कोटीमध्ये आपले शेअर्स विकले होते.

‌याप्रकरणाची चौकशी ईडीकडून सुरु आहे. ‌राज ठाकरे यांना चौकशीला पाचारण करुन त्यांच्यावर दबाव आणला जाईल, असे सांगण्यात येते. दरम्यान लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर चांगलेच ताशेरा ओढले होते त्यामुळे त्यांना लक्ष केलं जात असल्याचं बोललं जात आहे.
“जर सरकार सत्याचं असेल, तर पहिलं मुंबई बॅंकेत काहिशे कोटींचा घोटाळा करणा-या भाजपाच्या आमदारांची चौकशी करा.. नोटीस काढायची गरजपण लागणारं नाही, अर्ध्यापेक्षा भाजपाचे घोटाळेबाज आमदार जेलमध्ये असतील…”मनसेचे कार्यकर्ते संदीप देशपांडे यांनी असे ट्विट त्यांनी केलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number