Kishori Pednekar : विरोधी पक्षनेतीपदी निवड होताच किशोरी पेडणेकर आक्रमक, सरकारवर ओढले ताशेरे

विरोधीपक्ष नेती पदी पहिल्यांदा महिला बसणार आहे त्यामध्ये माझं नाव जाहीर झाले आहे ही आनंदाची गोष्ट आहे.   

Kishori Pednekar : विरोधी पक्षनेतीपदी निवड होताच किशोरी पेडणेकर आक्रमक, सरकारवर ओढले ताशेरे

मुंबई महापालिकेचा इतिहास खूप जूना आहे आणि या इतिहासात विरोधीपक्ष नेतेपदी पहिल्यांदा महिला बसणार आहे त्यामध्ये माझं नाव जाहीर झाले आहे ही आनंदाची गोष्ट आहे.   

विरोधी पक्षनेता पदच नाही 

दिल्ली सारख्या अनेक शहरात संख्याबळ कमी असुन विरोधीपक्ष नेता दिला जात आहे. मात्र महाराष्ट्र मध्ये ही स्थिती वेगळे झालेली पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षाला जागा द्यायची नाही हा त्यांचा प्रयत्न आहे. 

मेट्रो स्लॅब दुर्घटनेवर भाष्य 
मेट्रोचा हलगर्जीपणा कायम बघत आलो आहोत. जास्तीत जास्त लवकर त्या लोकांना मदत करता येईल असा प्रयत्न केला मात्र तरीही 2 जण मृत्यू मुखी पडले  म्हणून श्रद्धांजली दिली. मृत्यू पडलेल्या लोकांना लाखांमध्ये मदत करता त्यांना पण करोडो ची मदत केली पाहिजे त्यांच्या घरातल्यांना सरकारी नोकरी दिली पाहिजे.  

सभागृह म्हणजे आखाडा नाही 

काम करू द्यायचे नाही हे त्यांनी शिंदेकडून शिकून आले आहेत. ते ठरवून येतात एवढा गोंधळ घालून मुंबईकरांना चांगली काम होतील त्याचा लाभच होऊ द्यायचा नाही.  आम्ही आजही आवाज उठवण्यासाठी आहोत. सत्तेत असतानादेखील आम्ही विरोधकांसारखा आवाज उठवलेला आहे. अशा पद्धतीने महापौर बाहेरून सांगितलेल्या गोष्टीवर आवाज उठवत असतील तर आम्ही पंतप्रधानांना आम्ही पत्र देणार आहोत स्वदेशी म्हणतात मग विदेशी सोबत व्यवहार तुमच्याच लोकांकडून सुरू आहेत. हे जिवंत लोकांना न्याय देऊ शकत नाही ते मृत्यू झालेल्या लोकांना काय न्याय देणार? सभागृह हा ऐतिहासिक आहे. विरोधीपक्षासोबत क्रूर पद्धतीने वागणे चुकीचे आहे, असंही त्या म्हणाल्या. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number