मुंबईकरांसमोर महापौरांनी जोडले हात

भारतातील कोरोना परिस्थिती चिंताजनक बनत असून आरोग्य सेवेवर ताण पडला आहे. दुसऱ्या लाटेचा धोका अद्याप टळलेला नसल्याने आणि त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्याने मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी मुंबईकरांसमोर आज हात जोडले आहेत. किशोरी पेडणेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ‘४५ ते ६० वयोगटातील जे लोक दुसऱ्या डोससाठी येतील, त्यांना प्राध्यान्यक्रम दिला […]

मुंबईकरांसमोर महापौरांनी जोडले हात

भारतातील कोरोना परिस्थिती चिंताजनक बनत असून आरोग्य सेवेवर ताण पडला आहे. दुसऱ्या लाटेचा धोका अद्याप टळलेला नसल्याने आणि त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्याने मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी मुंबईकरांसमोर आज हात जोडले आहेत.

किशोरी पेडणेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ‘४५ ते ६० वयोगटातील जे लोक दुसऱ्या डोससाठी येतील, त्यांना प्राध्यान्यक्रम दिला जाईल. लसीकरणासाठी नोंदणी केल्यानंतर आणि मेसेज आल्यानंतरच १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस दिली जाईल. जशी लस उपलब्ध होईल, त्याप्रमाणे लसीकरण केंद्र सुरू राहतील’,अशी माहिती त्यांनी दिली.

‘जोपर्यंत मेसेज येत नाही, तोपर्यंत नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊ नये. जर तुम्ही नोंदणी केली आहे, पण मेसेज आलेला नाही, अशा नागरिकांनीही लसीकरण केंद्रावर जाऊ नये’, असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number