Kishori Pednekar on Ritu Tawde Controversy : ‘महापौरांना व्हीआयपी संस्कृतीचा मोह टाळता आला नाही…’, रितू तावडेंवर किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल

आता मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रितू तावडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

Kishori Pednekar on Ritu Tawde Controversy : ‘महापौरांना व्हीआयपी संस्कृतीचा मोह टाळता आला नाही…’, रितू तावडेंवर किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल

मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. . त्यांच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावण्यात आलेल्या लाल-निळ्या फ्लॅश दिव्यांमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. केंद्र सरकारने मे 2017 मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास बंदी घातली होती. बहुतांश सरकारी वाहनांवरील लाल दिवे हटवण्यात आले होते. मात्र, महापौरांच्या नव्या वाहनावर पुन्हा लाल-निळे फ्लॅश दिवे दिसल्याने नियमांचे उल्लंघन होत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.आता मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रितू तावडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

किशोरी पेडणेकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की,  नियमांना ब्रेक आणि महापौरांच्या गाडीला झगमगाट, मुंबईत व्हीआयपी संस्कृतीची पुन्हा एन्ट्री? दोन दिवसांपूर्वीच महापौर मॅडम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या जीआर ला दिलेल्या सूचनेला हरताल फसला. आता तर केंद्रसरकार यांनी दिलेला निर्णयाला हरताल फसला आहे”. 

हेही वाचा – Ritu Tawde Controversy : मुंबईच्या नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नेमकं चाललंय काय? घड्याळ प्रकरणानंतर आता लाल दिव्याची गाडी; मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट चर्चेत 

पुढे त्यांनी लिहिलं की, “व्हीआयपी संस्कृती पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार यांनी संपवली होती. पण, मुंबईच्या महापौरांना व्हीआयपी संस्कृतीचा मोह टाळता आला नाही. पंतप्रधान मोदी केंद्र सरकारचे निर्णय… महापौर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का?”, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहित रितू तावडे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

हेही वाचा – Excercise Tips: जिममध्ये तासनतास घाम गाळण्याची गरज नाही; दीर्घायुष्यासाठी आठवड्यात ‘इतकाच’ वेळ व्यायाम पुरेसा, संशोधनातून मोठा खुलासा 

याचसंदर्भात याचसंदर्भात मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या अधिकृत एक्स सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत, “नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललंय?” असं म्हटलं आहे, तसेच सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान मुंबईसारख्या आर्थिक राजधानीतही महापौरांच्या गाडीवरून लाल दिवा काढण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा यावरुन वाद सुरु झाला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number