Kishori Pednekar : पेडणेकरांची निष्ठा फळाला! ‘या’ प्रभागातून मिळाली उमेदवारी, एबी फॉर्म देखील हाती

मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या किशोरी पेडणेकर यांना पहिल्या टप्प्यात उमेदवारी न मिळाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Kishori Pednekar : पेडणेकरांची निष्ठा फळाला! ‘या’ प्रभागातून मिळाली उमेदवारी, एबी फॉर्म देखील हाती

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे गटाच्या पहिल्या उमेदवार यादीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या किशोरी पेडणेकर यांना पहिल्या टप्प्यात उमेदवारी न मिळाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मुंबई महानगरपालिकेची मागील निवडणूक 2017 रोजी झाली होती. यावेळी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर महापौर म्हणून कार्यरत होत्या. किशोरी पेडणेकर यांनी ज्या वॉर्ड क्रमांक 199 चे प्रतिनिधित्व केले, तेथूनच त्या पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या.

हेही वाचा- Kishori Pednekar : ठाकरेंच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना AB फॉर्म नाही?; मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट

शाखा क्रमांक 199 चे शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांच्या पत्नी अबोली खाडे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र, पक्षाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. किशोरी पेडणेकर यांना ठाकरे गटातून शाखा क्रमांक 199 मधून उमेदवारी जाहीर झाली आहे. एवढचं नव्हे तर किशोरी पेडणेकर यांना एबी फॉर्म देखील मिळाला आहे. यावेळी मतदारांच्या जीवावर निवडणूक लढवणार तसेच शेवट गोड झाला आणि आनंद झाला असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number