केदारनाथमधील ‘ती’ गुहा ऑक्टोबरपर्यंत हाऊसफुल्ल

लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान मोदींनी केदारनाथमधील एका गुहेत केलेली ध्यानधारणा हा विषय चर्चेत आला होता. त्यामुळे त्या गुहेलाही चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. आता मोदींपाठोपाठ त्या गुहेत ध्यानधारणा करण्यासाठी अनेक लोकांनी ती गुहा भाडेतत्त्वावर आरक्षित केली आहे. तसंच ऑक्टोबर महिन्यापर्यंत या गुहेचं आरक्षण हाऊसफुल झालं आहे. अवघ्या 900 ते 1500 रुपयांत ही जागा बुक करता येते. त्यामुळे ‘गढवाल […]

केदारनाथमधील ‘ती’ गुहा ऑक्टोबरपर्यंत हाऊसफुल्ल

लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान मोदींनी केदारनाथमधील एका गुहेत केलेली ध्यानधारणा हा विषय चर्चेत आला होता. त्यामुळे त्या गुहेलाही चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. आता मोदींपाठोपाठ त्या गुहेत ध्यानधारणा करण्यासाठी अनेक लोकांनी ती गुहा भाडेतत्त्वावर आरक्षित केली आहे. तसंच ऑक्टोबर महिन्यापर्यंत या गुहेचं आरक्षण हाऊसफुल झालं आहे. अवघ्या 900 ते 1500 रुपयांत ही जागा बुक करता येते. त्यामुळे ‘गढवाल मंडळ विकास निगम’ला आतापर्यंत  95 हजार एवढे उत्पन्न मिळालंय.

गढवाल मंडळ विकास निगमतर्फे गेल्यावर्षी केदारनाथमध्ये एक गुहा करण्यात आली.

मंदिरापासून अवघ्या 1 किमीच्या अंतरावर ही गुहा तयार करण्यात आली आहे.

आधी या गुहेचं एक दिवसाचं भाडं 3000 रुपये आकारलं जायचं.

गुहा कमीत कमी तीन दिवसांसाठी घ्यावी अशी अट मंडळाने घातली होती, यामुळे पर्यटकांचा प्रतिसाद मिळाला नाही.

तेव्हा मंडळाने यावर भाडं कमी करण्याचा निर्णय घेतला.

त्याप्रमाणे भाड्याचे दर एका दिवसांसाठी 990 आणि रात्रीसाठी 1500 रूपयांवर करण्यात आलंय.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी एकांत मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 तास याच गुहेमध्ये ध्यानधारणा करत होते.

तेव्हापासून ही गुहा लोकप्रिय झाली.

गुहा ध्यानधारणेसाठी केली असल्याने येथे एकांत मिळावा, म्हणून फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश दिला जातो. या गुहेत सर्व सुविधांनी सुसज्ज आहे. यात ध्यानधारणेसाठी बसलेल्या व्यक्तीला दिवसातून दोन वेळा नाश्ता आणि जेवणाची सोय केली आहे. तसेच गरजेच्या वेळी संपर्कासाठी इथे फोनची सोय केली आहे. त्यामुळे आतमधील व्यक्तीला कोणाताही त्रास होऊ नये याची विशेष दक्षता घेतली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number