Chhatrapati Sambhajinagar: बिहार हत्याकांडाचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगरपर्यंत; जाधववाडीतून दोन आरोपी ताब्यात

बिहारमधील एका धक्कादायक कौटुंबिक गुन्हा प्रकरणाचे धागेदोरे आता छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले आहेत

Chhatrapati Sambhajinagar: बिहार हत्याकांडाचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगरपर्यंत; जाधववाडीतून दोन आरोपी ताब्यात

बिहार राज्याला हादरवून सोडणाऱ्या चौघांच्या निर्घृण हत्याकांडाचा तपास आता महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचला आहे. या भीषण प्रकरणात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील एका तरुणाचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहर गुन्हे शाखेने बिहार पोलिसांच्या मदतीने जाधववाडी परिसरातून दोन आरोपींना ताब्यात घेतले असून या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये 11 मे रोजी एकाच कुटुंबातील चौघांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. मृतांमध्ये आई, वडील आणि दोन लहान मुलांचा समावेश होता. आरोपींनी हत्या केल्यानंतर मृतदेहांचे तब्बल 23 तुकडे केल्याची माहिती तपासात समोर आली होती. त्यानंतर हे अवयव पोत्यांमध्ये भरून नदीत फेकण्यात आले होते. या घटनेमुळे संपूर्ण बिहारमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा: Twisha Sharma Case: ‘मला गुदमरल्यासारखं होतंय आई…’; सततचा संशय, हुंड्यासाठी दबाव, निवृत्त न्यायाधीशांच्या दोन महिन्यांच्या गर्भवती सुनेने संपवलं आयुष्य

या प्रकरणाचा तपास करत असताना बिहारच्या रामगढ पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. तपासादरम्यान आरोपी महाराष्ट्रात लपल्याची माहिती समोर आल्यानंतर बिहार पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर शहर गुन्हे शाखेने विशेष पथक तयार करून जाधववाडी परिसरात सापळा रचला.

या कारवाईत दीपक देवसिंग राजपूत आणि गौतम उर्फ राहुल गुप्ता करमपाल गुप्ता या दोन आरोपींना अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत या दोघांचा हत्याकांडाशी संबंध असल्याचे समोर आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. अटक केल्यानंतर दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी बिहारच्या रामगढ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा: Crime : बापच बनला वैरी! क्षुल्लक कारणावरून 17 वर्षांच्या मुलीला विहिरीत ढकलून दिलं अन् बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली

या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही खळबळ उडाली असून आरोपींच्या पार्श्वभूमीबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. बिहार पोलिसांकडून या हत्याकांडामागील नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि इतर संभाव्य साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

चार जणांच्या हत्येनंतर मृतदेहांची अमानुष विटंबना करण्यात आल्याने हे प्रकरण विशेष गंभीर मानले जात आहे. या हत्याकांडाने बिहारसह देशभरात संतापाची लाट उसळली असून तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number