ट्विटर बंदीनंतर कंगनाचा सवाल..

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिला एक ट्विटर पोस्ट महागात पडली आहे. कंगना ही नेहमीच वादग्रस्त विधान हे ट्विटरच्या माध्यमातून करत असते. कंगनाने पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचारावर भाष्य करणारी एक वादग्रस्त पोस्ट लिहिली होती. यात तिने ममता बॅनर्जी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. त्यामुळे मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाईटवरील तिचे खाते आता निलंबीत करण्यात आले आहे. […]

ट्विटर बंदीनंतर कंगनाचा सवाल..

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिला एक ट्विटर पोस्ट महागात पडली आहे. कंगना ही नेहमीच वादग्रस्त विधान हे ट्विटरच्या माध्यमातून करत असते. कंगनाने पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचारावर भाष्य करणारी एक वादग्रस्त पोस्ट लिहिली होती. यात तिने ममता बॅनर्जी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. त्यामुळे मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाईटवरील तिचे खाते आता निलंबीत करण्यात आले आहे. ट्विटर अकाउंट बंद केल्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. इन्स्टाग्रामवरील या व्हिडिओमध्ये कंगनाने पश्चिम बंगालमधील राष्ट्रपती राजवट देण्याची शिफारस केली. शिवाय राज्यात निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हाभरात हिंसाचार वाढला आहे. याकडे आंतरराष्ट्रीय मीडियाचे लक्ष नाही असाही आरोप कंगनाने केला आहे. देशद्रोहीच देश चालवणार आहेत का? असा सवालही कंगनाने या व्हिडिओच्या माध्यमातून विचारला आहे. यापूर्वीच्या पंतप्रधानांनी राष्ट्रपती राजवट लागू केली होती तर मग आता बंगालमध्ये लागू करायला काय हरकत आहे असंही कंगनाने म्हटलंय. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल मंगळवारी कंगनाने काही पोस्टची मालिकाच चालवली होती. त्यानंतर ट्विचरने तिचे अकाउंट कायमचे बंद केले आहे. कंगनाने यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त ट्विट केली होते. शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त टिपणी केली होती तसेच जानेवारीमध्ये तांडव या वेब सिरीजबद्दल असेच वादग्रस्त ट्विट केले होते त्यानंतर अनेकांनी तिला चांगलचं सुनावलं होत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number