Kaju chi Bhaji : घरच्याघरी मालवणी स्टाईल बनवा ओल्या काजूगराची भाजी, जाणून घ्या रेसिपी

कोकणात काजूचा हंगाम सुरू झाला की ओल्या काजूगराची चविष्ट भाजी घराघरांत बनवली जाते.

Kaju chi Bhaji : घरच्याघरी मालवणी स्टाईल बनवा ओल्या काजूगराची भाजी, जाणून घ्या रेसिपी

कोकणात काजूचा हंगाम सुरू झाला की ओल्या काजूगराची चविष्ट भाजी घराघरांत बनवली जाते. नारळ, मालवणी मसाला आणि ताज्या काजूगराचा सुगंध यामुळे ही भाजी अतिशय खास आणि स्वादिष्ट लागते. साध्या पण पारंपरिक पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी जेवणाची चव वाढवते. गरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत ही भाजी अप्रतिम लागते. कोकणी  खाद्यसंस्कृतीत या पदार्थाला विशेष स्थान आहे. थोड्या साहित्यांत आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी ही भाजी पौष्टिक ठरते. घरच्याघरी चवदार ओल्या काजूगराची मालवणी स्टाईल भाजी कशी बनवायची ते जाणून घ्या.

साहित्य: 
ओले काजूगर (सोललेले), बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, सुके खोबरे, कोथिंबीर, मालवणी मसाला, हळद, मोहरी, तेल आणि मीठ.

कृती:
सर्वप्रथम ओले काजूगर सोलून घ्या.
त्यानंतर मंद आचेवर सुके खोबरे सोनेरी होईपर्यंत भाजा.
भाजलेले खोबरे, मालवणी मसाला आणि हळद यांचे वाटण तयार करा.
कढईत तेल गरम करून मोहरी टाका.
त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि आले-लसूण पेस्ट परतून घ्या.
यानंतर तयार केलेले वाटण घालून सर्व मिश्रण नीट मिक्स करा.
सोललेले काजूगर घालून थोडे परता.
शेवटी आवश्यकतेनुसार गरम पाणी आणि मीठ घालून भाजी छान शिजवून घ्या.
कोथिंबीर टाकून गरमागरम सर्व्ह करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number