Ashok Kharat Case : खोटी भविष्यवाणी, कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावात, त्याच जमिनीवर उभारले ईशानेश्वर मंदिर; खरातचा आणखी एक कारनामा उघड

शिर्डी प्रमाणेच सिन्नर येथे देखील अशोक खरातने फसवी भविष्यवाणी करत कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावात घेतली.

Ashok Kharat Case : खोटी भविष्यवाणी, कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावात, त्याच जमिनीवर उभारले ईशानेश्वर मंदिर; खरातचा आणखी एक कारनामा उघड

नाशिकचा स्वयंघोषित बाबा अशोक खरात याच्या गुन्ह्यांचा पाढा वाढतचं चालला आहे. शिर्डीत जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातसह त्याच्या पत्नीचं देखील नाव समोर आलं असून त्याची पत्नी कल्पना खरात सध्या फरार आहे. अशातच भोंदू अशोक खरात प्रकरणी खरातवर 14 वा गुन्हा दाखल झाला आहे. अशोक खरात आणि कल्पना खरातवर सिन्नर मिरगाव येथील जमीन खरेदी प्रकरणी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

माळी बंधूंकडून कवडीमोल भावात कोट्यवधी रुपयांची जमीन घेतली. एवढचं नव्हे तर तुम्ही जमीन विकली नाही तर 4 पैकी एका भावाचा मृत्यू होईल अशी फसवी बतावणी केली. यावेळी माळी बंधूंची फसवणूक करत 16 एकर जागा भोंदू खरातने हडप केली. तर याच जमिनीवर नंतर त्याने ईशानेश्वर मंदिर उभारले आणि स्वतःचा भव्य फार्म हाऊस बंधला. दरम्यान या बाबतीत सिन्नर पोलिसांकडून तपास सुरू आहे.

भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या तिसऱ्या गुन्ह्यात आज खरातला पुन्हा कोर्टात हजर होणार आहे. तर SIT ने भोंदू खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयातून महत्वाचे पुरावे जप्त केले आहे. यावेळी एका डब्यातून 22 रुद्राक्ष, इंग्रजीत A टू Z पर्यंत अक्षरं आणि 1 ते 26 अंक लिहिलेली पट्टी, शिवनिका संस्थानचे कोरे पावती पुस्तक, भिंग काच आणि हिरव्या मळकट रंगाचे पातळ द्रव्य असलेली बाटली SIT ने जप्त केली. आज तिसऱ्या गुन्ह्यात SIT पुन्हा करणार अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number