क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी १ लाख रुपयांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यासह उच्च न्यायालयाने आर्यन खानची सुटका केली आहे. उच्च न्यायालयाने आर्यनच्या जामीन अर्जावरील निकालाची प्रत जारी केली आहे. त्यामुळे आर्यनच्या जामीनसाठी अभिनेत्री जुही चावला जामीनदार म्हणून पुढे आली आहे.
उच्च न्यायालयाच्या जामीन अर्जावरील निकाल प्रतवर सही करण्यासाठी अभिनेत्री जुही चावला न्यायालयात दाखल झाली आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावर सही करण्यासाठी जुही चावला उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. न्यायालयात पोहचून जुहीकडून कायदेशीर पूर्तता करण्यात आली आहे.
आर्यनचा जामीन १४ अटींवर मजूंर करण्यात आला आहे. आर्यनसह तीघांनाही दिलासा मिळाला असून न्यायालयाने तिघांवर काही अटी घातल्या आहेत. न्यायालयाच्या परवानगीशिवाय तिघांनाही देशाबाहेर जाता येणार नसून पासपोर्ट जमा करण्याचे तसेच दर शुक्रवारी तिघांनीही एनसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तिघांनी मुंबईबाहेर जाण्यासाठी एनसीबी तपास अधिकाऱ्याला त्याची माहिती देऊन प्रवासाचा तपशील एनसीबी कार्यालयात दाखल करावा लागेल.