CJI Surya Kant on Delhi Pollution: ‘न्यायाधीशांकडे जादूची छडी नसते…’; वायू प्रदूषणावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांची प्रतिक्रिया

सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की प्रदूषण नियंत्रणासाठी केवळ चर्चांपेक्षा निर्णायक पावले अत्यावश्यक आहेत.

CJI Surya Kant on Delhi Pollution: ‘न्यायाधीशांकडे जादूची छडी नसते…’; वायू प्रदूषणावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांची प्रतिक्रिया

CJI Surya Kant on Delhi Pollution: दिल्ली-एनसीआरमधील गंभीर होत जाणाऱ्या वायू प्रदूषणाच्या समस्येबाबत सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पुन्हा एकदा तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. वायू गुणवत्तेची पातळी सतत खालावत असताना, सुनावणीदरम्यान एका वकिलाने परिस्थितीची तुलना ‘आणीबाणी’शी करत प्रदूषण नियंत्रणातील अपुर्‍या देखरेखीवर बोट ठेवले. यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, परिस्थितीची कारणे आम्हाला माहीत आहेत. आता देशाला उपायांची गरज आहे. त्यांनी या समस्येकडे दरवर्षी दिवाळीपासून हिवाळ्यापर्यंतच पाहिले जाते आणि हिवाळा संपताच या मुद्द्याचा विसर पडतो.  

समस्या भाषणांनी नाही, ठोस कृतीने सुटते  

सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की प्रदूषण नियंत्रणासाठी केवळ चर्चांपेक्षा निर्णायक पावले अत्यावश्यक आहेत. वकिलाने AQI तज्ज्ञ समितीकडून निश्चित केला जातो असे सांगताच, सरन्यायाधीशांनी सरकारने अशा समित्यांकडून सुचवलेले उपाय प्रत्यक्षात किती वापरले याची चौकशी करण्याचे संकेत दिले.

हेही वाचा – Delhi Blast Update: दिल्लीपेक्षाही मोठा स्फोट घडवण्याचा कट फसला; मुझम्मिलच्या कबुलीजबाबातून उलगडले दहशतवादी मॉड्युलचे गुपित

न्यायालयाकडे जादूची कांडी नाही 

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी प्रदूषण रोखण्यासाठी तात्काळ आणि प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, न्यायाधीशांकडे हवा स्वच्छ करण्यासाठी जादूची कांडी नाही. समस्येची मूळ कारणे अनेक आहेत. त्यांचे वैज्ञानिक विश्लेषण आणि तज्ज्ञांची मदत अत्यावश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली.  

हेही वाचा – Delhi Blast Update: अल-फलाह युनिव्हर्सिटीतील डॉक्टरचे दहशतवादी कनेक्शन उघड; भाड्याने राहायचा तीन बेडरूच्या प्रशस्त फ्लॅटमध्ये

दिल्लीमध्ये वायू गुणवत्ता पुन्हा ‘अत्यंत खराब’ श्रेणीत

गुरुवारी दिल्लीमध्ये AQI 355 नोंदवला गेला, जो अत्यंत खराब (Very Poor) श्रेणीत मोडतो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार  केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मते, AQI 0 ते 50 दरम्यान 'चांगला', 51 ते 100 दरम्यान 'समाधानकारक', 101 ते 200 दरम्यान 'मध्यम', 201 ते 300 दरम्यान 'खराब', 301 ते 400 दरम्यान 'अत्यंत खराब' आणि 401 ते 500 दरम्यान 'गंभीर' मानला जातो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number