Bihar CM Samrat Chaudhary : RJD – JDU तून प्रवास, भाजपमध्ये प्रवेश अवघ्या 6 वर्षात झाले बिहारचे मुख्यमंत्री, कोण आहेत सम्राट चौधरी?

2026 मध्ये नितीश कुमार राज्यसभेवर गेल्यानंतर मुख्यमनातरी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि सम्राट चौधरी यांचं नवा आघाडीवर होतं.

Bihar CM Samrat Chaudhary : RJD – JDU तून प्रवास, भाजपमध्ये प्रवेश अवघ्या 6 वर्षात झाले बिहारचे मुख्यमंत्री, कोण आहेत सम्राट चौधरी?

बिहारचे २० वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर नितीश कुमारांचं पर्व संपलं. म्हणून भाजपचा मुख्यमंत्रीपदासाठीचा मार्ग मोकळा झाला. राज्यात २०२५ मध्ये झालेल्या निवडणुकीत तब्बल ८९ आमदार निवडून आल्यामुळे राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आला. पण, नितीश कुमार मुख्यमंत्रीपदावर असून बसल्यामुळे भाजपचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण झालं नाही. 

बिहारचा २०२५ चा विधानसभेचा निकाल काय लागला?

२०२५ च्या बिहार निवडणुकीमध्ये NDA आणि महागठबंधंनमध्ये मुख्य लढत होती. NDA मध्ये भाजप, जेडीयू आणि चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी एकत्र लढत होती. तर महागठबंधंनमध्ये आरजेडी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढत होता. सोशल मीडियाचा योग्य वापरामुळे आरजेडीचे तेजस्वी यादव यांचे NDA ला तगडं आव्हान होतं. पण बिहार निवडणुकीत नितीश कुमार आणि नरेंद्र मोदींची जादू चालली आणि २४३ जागांपैकी NDA ने २०२ जागांवर घवघवीत यश मिळवलं.

२०२५ मध्ये मुख्यमंत्री पदासाठी भाजप आणि जेडीयूची रस्सीखेच 

बिहारमध्ये मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. भाजपच्या सर्वात जास्त जागा येऊन सुद्धा जेडीयूसोबत असल्यामुळे नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण देशाच्या राजकारणात वाढतं यश, राज्यात कमी लक्ष झाल्यामुळे नितीश कुमारांना केंद्राकडे वारे लागू लागले. त्यामुळे बिहारमध्ये भाजपचा पहिला मुख्यमंत्री बसवण्याची संधी चालून आली. २०२६ मध्ये नितीश कुमार राज्यसभेवर गेल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात सम्राट चौधरी यांचं नवा आघाडीवर होतं.

कोण आहेत सम्राट चौधरी?

सम्राट चौधरी यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९६८ साली झाला. १९९० साली सक्रिय राजकारणात आले. लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षातून राजकारणाची सुरुवात केली. १९९९ मध्ये राबडी देवींच्या मंत्रिमंडळात चौधरी कृषिमंत्री म्हणून काम केलं. पण कमी वयाचा वाद पुढे आल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. नंतर २००० साली आरजेडीच्या तिकिटावर निवडणूक लढले आणि विजयी झाले. त्यानंतर चौधरी यशाची प्रत्येक पायरी चढत गेले.

२०१४ मध्ये लालूप्रसाद यादव यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर एका आमदारांचा एक गट वेगळा करून त्यांनी तत्कालीन नितीश कुमार यांच्या सरकारला पाठिंबा देखील दिला. आणि सरकारमध्ये शामिल झाले. तत्कालीन मंत्रिमंडळात नगर विकास आणि गृहनिर्माण मंत्री झाले. २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. काही कालावधीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्षसुद्धा झाले.

सम्राट चौधरी यांचं बिहारमध्ये जातीचं समीकरण

सम्राट चौधरी हे नितीश कुमारांच्या कोईरी समाजातून येतात. राज्यात या समाजाचा एक वर्ग आहे आणि जेडीयूचा त्यांवर मोठा प्रभाव असल्याचं मानलं जातं. नितीश कुमारांचं मोठं राजकारण या समाजाच्या अवतीभवती फिरलं जातं. त्यामध्येच सम्राट चौधरी कोईरी समाजातून येत असल्यामुळे एक मोठा वर्ग त्यांच्या मागे उभा होता त्यांचा फायदा घेण्यासाठी २०२० मध्ये भाजपने त्यांना विधानपरिषदेवर पाठवले आणि २०२३ मध्ये त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष केले.

हेही वाचा : Bihar CM Samrat Chaudhary Oath : बिहारमध्ये भाजपचे 'सम्राट' पर्व! 24 व्या मुख्यमंत्रीपदी सम्राट चौधरी विराजमान; शपथविधी संपन्न

सम्राट चौधरी २०२२ मध्ये विरोधीपक्ष नेते पदावर असताना आईचं निधन झालं होतं. त्या काळात डोक्यावर पगडी घातली होती. विधान परिषदेत तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमारांनी चौधरींना डिवचलं होतं. तेव्हा सम्राट चौधरी संतापून नितीश कुमारांना 'तुम्हाला मुख्यमंत्रीपदावरून पायउतार केल्याशिवाय शांत बसणार नाही', अशी शपथ घेतली होती. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number