NCP Merger: ‘काँग्रेसमध्ये जाणे म्हणजे बुडत्या नावेत बसणे…’; शरद पवारांना ‘या’ नेत्याने दिली पक्षात सामील होण्याची जाहीर ऑफर

महाविकास आघाडीत शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा अफवांना उधाण आले असतानाच, आता महायुतीतील एका बड्या नेत्याने पवारांना थेट आपल्यासोबत येण्याची मोठी ऑफर दिली आहे.

NCP Merger: ‘काँग्रेसमध्ये जाणे म्हणजे बुडत्या नावेत बसणे…’; शरद पवारांना ‘या’ नेत्याने दिली पक्षात सामील होण्याची जाहीर ऑफर

NCP Merger: राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. महाविकास आघाडीत शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा अफवांना उधाण आले असतानाच, आता महायुतीतील एका बड्या नेत्याने पवारांना थेट आपल्यासोबत येण्याची मोठी ऑफर दिली आहे. अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवारांना काँग्रेसऐवजी महायुतीत एकत्र येण्याचे आवाहन केल्याने राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

'आमचा पक्ष मोठा भाऊ, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात एकत्र या'
शरद पवार गटावर निशाणा साधताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, पवार गटाने काँग्रेसमध्ये विलीन होणे म्हणजे स्वतःहून बुडत्या नावेत पाय ठेवण्यासारखे आहे; तिथे जाऊन त्यांच्या पदरी काहीही पडणार नाही. त्याऐवजी सध्या सत्तेत असलेला आमचा गट हा 'मोठा भाऊ' असून, शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात आमच्यासोबत एकत्र यावे, असा खोचक सल्ला आत्राम यांनी दिला. विलीनीकरण करायचेच असेल, तर ते कौटुंबिक आणि राजकीयदृष्ट्या महायुतीसोबत व्हावे, अशी खुली ऑफर त्यांनी दिली.

दरम्यान, राजकीय विलीनीकरणासोबतच धर्मरावबाबा आत्राम यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त करत 'शहरी नक्षलवादा'चा मुद्दा उपस्थित केला. जंगलातील नक्षलवाद आता संपुष्टात येत असला, तरी शहरांमधील नक्षलवाद हे नवे आणि मोठे आव्हान असल्याचे ते म्हणाले. सरकार विरोधी आंदोलनांच्या आड शहरी नक्षलवादी सक्रिय असून, ते सुशिक्षित तरुणांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत. गडचिरोलीसह नागपुरात आगामी काळात होणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनातही अशा समाजकंटकांचा हात असण्याची दाट शक्यता त्यांनी वर्तवली.

हेही वाचा – Rohit Pawar Hunger Strike Update: मोठी बातमी! महाजनांच्या आश्वासनानंतर रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन मागे, शेतकरी मागण्यांवर लवकरच होणार निर्णय

विलीनीकरणाच्या वावड्यांवर सुप्रिया सुळेंचे थेट स्पष्टीकरण
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या विलीनीकरणाच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र आक्षेप घेत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 'आमच्या पक्षाचे आमदार, खासदार किंवा स्वतः शरद पवार यांच्याशी विलीनीकरणाबाबत कोणीही संपर्क साधलेला नाही आणि आम्हीही कोणाला प्रस्ताव दिलेला नाही. ही विलीनीकरणाची चर्चा नेमकी कुणाच्या सुपीक डोक्यातून निघाली, हेच मला समजत नाही,' अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी या सर्व चर्चा निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number