महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. आता अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची मोठी भरती होणार आहे. या भरतीसाठी सरकारने मंजुरी दिली असून 5012 पदं भरली जाणार आहेत. याबद्दलची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
राज्यातील सुमारे 1200 अनुदानित महाविद्यालयांमध्ये 5400 प्राध्यापक पदांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच विद्यापीठांमध्येही 700 प्राध्यापकांची भरती होणार असून एकूण मिळून 6 हजारांहून अधिक पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
हेही वाचा – MPs Suspension Revoked: विरोधी पक्षांना मोठा दिलासा; 8 खासदारांचे निलंबन अखेर मागे
राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता नव्या महाविद्यालयांना अनुदानित तत्त्वावर परवानगी देण्याच्या धोरणात बदल करणे सध्या शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 2001 पासून राज्यात नव्या महाविद्यालयांना विना-अनुदानित तत्त्वावर परवानगी देण्याचे धोरण लागू आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध सवलती दिल्या जातात, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
हेही वाचा – Namo Shetkari Yojana: पीएम किसान योजने पाठोपाठ आता नमो शेतकरीचाही हप्ता होणार जमा; 1774 कोटींचा निधी मंजूर
दरम्यान, आता उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत अनुदानित महाविद्यालयांतील सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील एकूण 11,918 रिक्त पदांपैकी 5012 पदे भरण्यास मंजुरी देण्यात आल्याने राज्यातील उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.