Jitendra Awhad: ‘फडणवीसांचं पद जावं म्हणून मंत्रतंत्र’, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप

नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून विधानसभेत मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

Jitendra Awhad:  ‘फडणवीसांचं पद जावं म्हणून मंत्रतंत्र’, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप

मुंबई: स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. धर्माच्या नावाखाली महिलांशी अश्लील वर्तन केल्याचे आरोप आणि त्यासंदर्भातील व्हिडिओ समोर आल्यानंतर नाशिक पोलिसांनी अशोक खरातला अटक केली असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान या प्रकरणात काही राजकीय संबंध समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून विधानसभेतही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात गंभीर आरोप करत राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापवले आहे.

विधानसभेत बोलताना आव्हाड म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न त्यांच्या जवळच्या लोकांकडूनच केला गेला आहे.”

हेही वाचा: Satara Accidents: साताऱ्यात मृत्यूचे तांडव! काही तासातच एकामगोमाग एक भीषण अपघात, प्राध्यापिकेसह तिघांचा अंत

आव्हाड पुढे म्हणाले, “मी एकनाथ शिंदे यांचे नाव घेत नाही. पण देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला कसा सुरुंग लावता येईल, यासाठी त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि आमदार अशोक खरातकडे जाऊन मंत्र-तंत्र आणि अघोरी पूजा करून घेत होते,” असा आरोप त्यांनी केला.

त्यांच्या या आरोपांना पुरावे असल्याचा दावा करत आव्हाड म्हणाले की, “हे सर्व पुराव्यासह सिद्ध होईल. फडणवीस यांनाही याबाबत माहिती आहे. सध्या चौकशी सुरू असल्याने लवकरच संपूर्ण सत्य समोर येईल.”

यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरही भाष्य केले. “महाराष्ट्रात सध्या जे काही घडत आहे ते काही चांगले नाही. या प्रकरणातून अनेक गोष्टी समोर येतील,” असे आव्हाड म्हणाले.

दरम्यान, आव्हाड यांच्या या गंभीर आरोपांमुळे राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. खरात प्रकरणाच्या तपासातून नेमकी कोणती नावे समोर येतात आणि या आरोपांवर संबंधित नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: राज्यावर दुहेरी अस्मानी संकट! पारा 40 पार, तर दुसरीकडे अवकाळीचे सावट; वाचा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number