लॉकडाऊन दरम्यान उद्योगपती वाधवान आणि कुटुंबियांचा महाबळेश्वर प्रवास आता राजकीय वादाचा विषय बनला आहे. अशातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वाधवान यांच्या प्रवास प्रकरणी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय भाजपचं दुकानच चालत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही घटने पवार साहेबांचं नाव घुसवून भाजपची नेते मंडळी आपल्याराजकीय पोळ्या शेकून घेत असतात, असा इतिहास आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
पवार कुटुंबियांचे वाधवान कुटुंबियांशी घरगुती संबंध आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या परवानगीशिवाय वाधवान यांना पत्र मिळणं शक्य नव्हतं. पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आदेश दिला आणि त्यामुळेच वाधवान कुटुंबाला पत्र मिळालं आणि २३ जणांनी प्रवास केला, असं सोमय्या म्हणाले होते.